Corona Virus : पहिल्या लाटेत ४३ हजार, दुसऱ्यात १ लाख रुग्ण, तर तिसऱ्यात किती ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 5, 2021 08:14 PM2021-07-05T20:14:24+5:302021-07-05T20:15:58+5:30

Corona Virus in Aurangabad News : तिसर्‍या लाटेत ‘डेल्टा प्लस’ या नवीन म्युटेशनचा संसर्ग पसरण्याची शक्यता वर्तवली आहे.

Corona Virus: 43,000 in the first wave, 1 lakh in the second, and how many in the third? | Corona Virus : पहिल्या लाटेत ४३ हजार, दुसऱ्यात १ लाख रुग्ण, तर तिसऱ्यात किती ?

Corona Virus : पहिल्या लाटेत ४३ हजार, दुसऱ्यात १ लाख रुग्ण, तर तिसऱ्यात किती ?

googlenewsNext
ठळक मुद्देग्रामीणमध्ये संथगतीने लसीकरणशहरात लसीचा तुटवडा

- मुजीब देवणीकर
औरंगाबाद : कोरोनाचा संसर्ग मार्च २०२० मध्ये पहिल्यांदा शहरात पाहायला मिळाला. पहिल्या लाटेत जिल्ह्यात ४३ हजार ७०० बाधित आढळून आले. दुसर्‍या लाटेत आकडा दुपटीने वाढला. तब्बल १ लाख २ हजार ५०८ नागरिकांना लागण झाली. आता तिसर्‍या लाटेत ‘डेल्टा प्लस’ या नवीन म्युटेशनचा संसर्ग पसरण्याची शक्यता वर्तवली आहे. त्यामुळे तिसरी लाट आलीच, तर यात जिल्ह्यातील बाधितांची संख्या किती होईल, असा प्रश्न उपस्थित होत आहे. ( 43,000 in the first wave, 1 lakh in the second, and how many in the third?) 

कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत ३० जूनपर्यंत जिल्ह्यात एकूण १ लाख ४६ हजार २०८ बाधित निघाले. त्यापैकी १ लाख ४२ हजार १३२ रुग्ण बरे होऊन घरी परतले, तर ३ हजार ४२६ बाधितांचा मृत्यू झाला. पहिल्या लाटेत मार्च २०२० ते फेब्रुवारी २०२१ दरम्यान जिल्ह्यात एकूण ४३ हजार ७०० बाधित आढळून आले. मात्र मार्च ते जून या चारच महिन्यात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत जिल्ह्यात तब्बल १ लाख २ हजार ५०८ बाधित आढळून आले.

जिल्हा सुरक्षित ठेवायचा, तर लस हवी
जुलै महिन्यात मागील तीन दिवसांपासून ग्रामीण भागातील रुग्णांची रोजची संख्याही कमी आढळून येत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेला दिलासा मिळाला आहे. ग्रामीण भागात लसीकरणाला पाहिजे तसा वेग मिळत नाही. शहरात लसीचा साठा उपलब्ध होत नसल्याने मोहिमेत वारंवार व्यत्यय येत आहे. शहरात किमान ७० टक्के नागरिकांचे लसीकरण होणे आवश्यक असल्याचे मत यापूर्वीच मनपा प्रशासक आस्तिककुमार पाण्डेय यांनी व्यक्त केले आहे.

चार महिन्यात २ हजार १५८ रुग्णांचा मृत्यू
पहिल्या लाटेत औरंगाबादेत बाधितांमध्ये मृत्यूचे प्रमाण अधिक होते. त्यावेळी राज्य आणि जिल्ह्याच्या तुलनेत शहराचा मृत्यू दर हा ५ टक्क्यांपर्यंत पोहोचला होता. दुसऱ्या लाटेत मात्र ग्रामीण व राज्याच्या तुलनेत शहराचा मृत्यू दर कमी होता. जिल्ह्यात १ मार्च ते ३० जून या कालावधीत एकूण २ हजार १५८ बाधितांचा मृत्यू झाला. बाधितांच्या तुलनेत मृत्यू दराचे प्रमाण २.१० टक्के आहे.

लसीकरणाचा फायदा होईल
तिसरी लाट आली तरी, त्यात जीवित हानी कमी होईल. लसीकरण फॅक्टर आपल्याकडे आहे. पहिल्या, दुसऱ्या लाटेत हार्ड इम्युनिटी नव्हती. अशासकीय संस्थांनी तिसऱ्या लाटेबद्दल वेगवेगळी भाकीते वर्तविली आहेत. शासनाकडून अद्याप अधिकृतपणे असा कोणताही इशारा देण्यात आलेला नाही. संभाव्य लाट गृहित धरून तयारी सुरू आहे. ‘डेल्टा प्लस’ कशा पद्धतीने संसर्ग पसरवेल हे सांगणे कठीण आहे.
- डॉ. नीता पाडळकर, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, मनपा.

चार महिन्यांतील रुग्ण, मृत्यू संख्या...
महिना - शहर - ग्रामीण
मार्च २४,१८८- ८,१२५
एप्रिल- २१,२९५- २०,२३३
मे - ६,६६६ - १८,५२५
जून- ८९१- २,५८५
एकूण ५३,०४० -४९,४६८
------------------------
एकूण बाधित - १,२,५०८
एकूण मृत्यू - २,१५८
 

Web Title: Corona Virus: 43,000 in the first wave, 1 lakh in the second, and how many in the third?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.