corona virus : पंधरवड्यात विदेशातून ३१ जण औरंगाबादेत; सर्वांची कोरोना तपासणी होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 2, 2021 02:12 PM2021-12-02T14:12:06+5:302021-12-02T14:15:02+5:30

corona virus in Aurangabad : मागील १५ दिवसांत विदेशातून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला.

corona virus : 31 foreigners in Aurangabad in last 15 days; All will undergo corona examination | corona virus : पंधरवड्यात विदेशातून ३१ जण औरंगाबादेत; सर्वांची कोरोना तपासणी होणार

corona virus : पंधरवड्यात विदेशातून ३१ जण औरंगाबादेत; सर्वांची कोरोना तपासणी होणार

googlenewsNext

औरंगाबाद : दक्षिण आफ्रिकेतील ओमायक्रॉन विषाणूच्या (Omicron Variant) पार्श्वभूमीवर आरोग्य यंत्रणा अधिक सजग झाली आहे. मागील १५ दिवसांत विदेशातून शहरात आलेल्या ३१ प्रवाशांची यादी बुधवारी महापालिकेला प्राप्त झाली ( 31 foreigners in Aurangabad in last 15 days) आहे. त्यातील २० जणांशी सायंकाळी महापालिकेने युद्धपातळीवर संपर्क साधून गुरुवारी त्यांची कोरोना तपासणी केली जाणार (corona virus in Aurangabad ) असल्याचे आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. पारस मंडलेचा यांनी सांगितले. उर्वरित ११ नागरिकांमध्ये दोघे जण विदेशातील असून, दोन जण मुंबई व ग्रामीण भागातील आहेत.

मागील १५ दिवसांत विदेशातून आलेल्या नागरिकांची कोरोना चाचणी करण्याचा निर्णय शासनाने घेतला. विदेशातून शहरात आलेल्या प्रवाशांची यादी बुधवारी सायंकाळी जिल्हा परिषदेकडून मनपाला प्राप्त झाली. नऊ जणांच्या एका यादीत दोन जण मुंबईचे आहेत. एक जण ग्रामीण भागातील व दुसरा जालना जिल्ह्यातील आहे. पाच जण शहरात आले असून, त्यापैकी दोन जण विदेशी नागरिक आहेत. या दोघांची आरटीपीसीआर केली असता ती निगेटिव्ह आली आहे. सध्या ते दिल्लीला गेले असून, तेथेही त्यांनी कोरोना चाचणी केली असता ती निगेटिव्ह आली. उर्वरित तीन प्रवासी रोजाबाग, सिडको एन-३, समर्थनगर येथील रहिवासी आहेत.

१७ जण शहरातील
२२ प्रवाशांच्या आणखी एका यादीतील एकाचा मोबाइल लागत नाही. दोघे जण बाहेरील जिल्ह्यातील आहेत. दोन जण ग्रामीण भागातील आहेत. उर्वरित १७ नागरिक शहरातील असून, त्यामध्ये गारखेडा-१, बुढीलेन-४, रेल्वे स्टेशन-१, वेदांतनगर-१, सिडको एन-३ मधील २, सिडको एन-१ मधील १, बीड बायपास-१, पडेगाव-२, शास्त्रीनगर-१, राजाबाजार-१, जुना बाजार-१, समर्थनगर-१ यांचा समावेश आहे.

मनपाच्या यंत्रणेची धावपळ
ज्या भागात विदेशातून आलेले नागरिक राहत आहेत त्या भागातील मनपाच्या वैद्यकीय अधिकाऱ्यांनी संपर्क साधला. संबंधित प्रवाशांना गुरुवारी कोरोना तपासणी करण्यासाठी आरोग्य केंद्रात बोलाविण्यात येणार असल्याचे डॉ. मंडलेचा यांनी सांगितले.

Web Title: corona virus : 31 foreigners in Aurangabad in last 15 days; All will undergo corona examination

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.