औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी २७५ रुग्णांची वाढ; चार रुग्णांचा मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 01:35 PM2021-02-26T13:35:06+5:302021-02-26T13:36:22+5:30

corona virus जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४९ हजार ५६६ झाली आहे. आतापर्यंत ४६ हजार ७९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले.

corona virus : 275 more corona patients in Aurangabad district on Thursday; Death of four patients | औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी २७५ रुग्णांची वाढ; चार रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद जिल्ह्यात गुरुवारी २७५ रुग्णांची वाढ; चार रुग्णांचा मृत्यू

googlenewsNext
ठळक मुद्दे सध्या जिल्ह्यात १५११ रुग्णांवर सुरू उपचार आहेत

औरंगाबाद : जिल्ह्यात गुरुवारी दिवसभरात तब्बल २७५ नव्या कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७२ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरू असताना चार रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात सध्या १५११ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या ४९ हजार ५६६ झाली आहे. आतापर्यंत ४६ हजार ७९३ रुग्ण कोरोनामुक्त झाले. एकूण १,२६२ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या २७५ रुग्णांत मनपा हद्दीतील सर्वाधिक २४६, तर ग्रामीण भागातील २९ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ५० आणि ग्रामीण भागातील २२ अशा एकूण ७२ रुग्णांना गुरुवारी सुटी देण्यात आली. उपचार सुरू असताना बीड बायपास सातारा परिसरातील ७३ वर्षीय पुरुष, गडलिंब, गंगापुरातील ५० वर्षीय स्री, देवानगर येथील ८० वर्षीय पुरुष आणि खासगी रुग्णालयात गारखेडा परिसरातील ७३ वर्षीय स्री कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
कांचनवाडी १, गारखेडा ३, उल्कानगरी २, वेदांत नगर ५, हर्सूल १, उत्तमनगर १, शिल्पनगर १, म्हाडा कॉलनी, बाबा पेट्रोलपंप २, रेल्वे स्टेशन १, ज्योती नगर १, जवाहर कॉलनी ४, पद्मपुरा १, रोशन गेट १, इटखेडा १, बीड बायपास परिसर ८, चेतना टॉवर १, संत एकनाथ रंगमंदिर परिसर १, पेठेनगर, भावसिंगपुरा १, हरसिद्धी नगर १, श्रीकृष्णनगर हडको २, एन-१२ येथे १, एन-९ सिडको २, एन-४ सिडको १, सूतगिरणी चौक १, एन-दोन सिडको ६, एन-तीन सिडको २, एन-४ येथे सिडको १, जयभवानी नगर ३, ज्योती नगर १, शिवाजीनगर २, एमआयडीसी कॉलनी, नारेगाव १, एन-सात सिडको १, एम-दोन सिडको १, एन ६ येथे सिडको १, चिकलठाणा १, सुराणा नगर २, समर्थनगर १, दशमेश नगर १, हनुमाननगर १, दिव्य मराठी कार्यालय परिसर १, बालाजीनगर १, शिवशंकर कॉलनी १, देवानगरी १, एन आठ सिडको १, अरुणोदय कॉलनी १, विद्यानगर १, सुधाकर नगर १, पॉवर हाऊस १, सुंदर नगर, पडेगाव १, यशोधरा कॉलनी १, इएसआयएस स्टाफ क्वाॅर्टर परिसर ४, दिशा नगरी, बीड बायपास १, ठाकरे नगर १, मामा चौक, पदमरा १, गजानन कॉलनी, गारखेडा १, उस्मानपुरा १, टिळकनगर, जवाहर कॉलनी १, पदमरा २, मीरा नगर, पडेगाव ३, शहानूरवाडी १, एअरपोर्ट समोरील परिसर १, सिडको १, सुशीला अपार्टमेंट, विद्यानगर १, पीडब्ल्यूडी कॉलनी, बीड बायपास १, एन वन सिडको २, केशवनगरी, शहानूरवाडी २, एन अकरा सिडको १, एन नऊ सिडको २, हनुमान मंदिर, द्वारका चौक १, एमजीएम कॅम्पस १, हडको १, एन बारा हडको १, मराठा हायस्कूल परिसर १, कासलीवाल मार्बल, बीड बायपास १, अन्य १३३.

ग्रामीण भागातील रुग्ण
लासूर स्टेशन, वैजापूर १, डोणगाव, गंगापूर ३, चौका, फुलंब्री २, पिशोर, कन्नड १, सारा समृद्धी वडगाव १, दक्षिणमुखी हनुमान मंदिर बजाज नगर १, वडगाव १, द्वारकानगरी, बजाज नगर १, अयोध्यानगर, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, एस टी कॉलनी बजाज नगर १, अन्य १५.

Web Title: corona virus : 275 more corona patients in Aurangabad district on Thursday; Death of four patients

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.