Corona Vaccination: चिंताजनक ! आधी वाढला, आता पुन्हा गडगडला लसीकरणाचा टक्का

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 4, 2021 11:28 AM2021-12-04T11:28:13+5:302021-12-04T11:29:49+5:30

Corona Vaccination in Aurangabad: सीकरणाच्या ‘औरंगाबाद पॅटर्न’ची राज्यभरात जोरदार चर्चा झाली, परंतु जोमात सुरू असलेल्या या लसीकरणाला ब्रेक लागला आहे.

Corona Vaccination: Increased before, now thundered again Vaccination Percentage | Corona Vaccination: चिंताजनक ! आधी वाढला, आता पुन्हा गडगडला लसीकरणाचा टक्का

Corona Vaccination: चिंताजनक ! आधी वाढला, आता पुन्हा गडगडला लसीकरणाचा टक्का

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाच्या नव्या ओमायक्रॉन उत्परावर्तित (Omicron Variant ) विषाणूला रोखण्यासाठी जिल्हा, मनपा, पोलीस प्रशासनाने कंबर कसली आहे. मात्र, दुसरीकडे कोरोना प्रतिबंधक लसीकरणाचा टक्का घसरू लागला आहे. २५ नोव्हेंबर ते २ डिसेंबरपर्यंत लसीकरणाची आकडेवारी कमी ( Decrease of Corona Vaccination in Aurangabad ) होत चालल्याचे दिसत आहे.

मागील चार दिवसांपासून दैनंदिन लसीकरणाचे प्रमाण ७० हजारांवरून थेट २९ हजारांवर आली आहे, तसेच विनामास्क बाहेर पडणाऱ्या नागरिकांमुळे चिंतेत भर पडू लागली आहे. लसीकरणाच्या ‘औरंगाबाद पॅटर्न’ची राज्यभरात जोरदार चर्चा झाली, परंतु जोमात सुरू असलेल्या या लसीकरणाला ब्रेक लागला आहे. २२ नोव्हेंबरपासून दररोज ६० हजारांच्या वर लसीकरण होत असताना हा आकडा निम्म्यावर येत आहे. प्रशासनाने ९ नोव्हेंबरपासून शहर आणि ग्रामीण भागात १०० टक्के लसीकरण होण्यासाठी मोहीम सुरू करीत लसीकरणाच्या वेळा वाढविल्या. शहरात व ग्रामीण भागात काही केंद्रांवर रात्री ११ वाजेपर्यंत, तर काही केंद्रांवर २४ तास लसीकरणाची सुविधा दिली. त्यामुळे लसीकरणाचे दैनंदिन प्रमाण १५ हजारांवरून ७४ हजारांवर पोहोचले, परंतु गेल्या चार दिवसांपासून पुन्हा हा वेग मंदावला आहे. नागरिक लसीकरणाकडे पाठ फिरवित असल्याने, २९ हजारांवर दैनंदिन लसीकरण आले आहे. जिल्ह्यात एकूण लसीकरणाचे उद्दिष्ट ३२ लाख २४ हजार ७०० एवढे असून, २ डिसेंबरपर्यंत एकूण २४ लाख ८७ हजार ४३२ (७७.१४ टक्के) नागरिकांनी लसीचा पहिला डोस घेतला आहे.

विरोध करणाऱ्यावर गुन्हा दाखल करा
जिल्ह्यात लसीकरणाची मोहीम प्रभावीपणे राबवावी. परदेशातून आलेल्या प्रवाशांची नियमानुसार तपासणी करावी. जे विरोध करतील, त्यांच्यावर गुन्हे दाखल करा. जिल्ह्यातील प्रवेश ठिकाणांवर परिवहन विभागाने कर्नाटक राज्यातून येणाऱ्या वाहनांची नियमानुसार काटेकोरपणे तपासणी करावी, असे जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी कोविड टास्क फोर्सच्या बैठकीत शुक्रवारी सांगितले. जि.प. सीईओ नीलेश गटणे, पोलीस अधीक्षक निमित गोयल, अप्पर जिल्हाधिकारी डॉ.अनंत गव्हाणे आदी बैठकीत होते. हातगाडी चालक, दुकानदार यांच्या लसीकरणावर भर द्या, असे जिल्हाधिकारी म्हणाले.

असा मंदावला वेग :
तारीख- शहर--- ग्रामीण- ---एकूण लसीकरण
२५ नोव्हेंबर- २१,९४८ - ५३,६३५ -७५,५८३
२६ नोव्हेंबर- २२,८६४-४९,१७७-७२,०४१
२७ नोव्हेंबर- २४,१३६-५२,२६९-७६,४०५
२८ नोव्हेंबर- १६,२४०-२८,५३७-४४,७७७
२९ नोव्हेंबर- २१,५७७-४३,७६९-६५,३४६
३० नोव्हेंबर- २०,४७६-४७,३८१-६७,८५७
१ डिसेंबर- १०,३३६-२५,८५९-३६,१९५
२ डिसेंबर- ६,३८६-२३,४८८-२९,८७४

Web Title: Corona Vaccination: Increased before, now thundered again Vaccination Percentage

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.