औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४६ हजारांवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 7, 2021 12:20 PM2021-01-07T12:20:55+5:302021-01-07T12:22:48+5:30

coronavirus in aurangabad : जिल्ह्यातील आतापर्यंत ४४ हजार ३४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले

Corona number of patients in Aurangabad district is over 46 thousand | औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४६ हजारांवर

औरंगाबाद जिल्ह्यातील कोरोना रुग्णसंख्या ४६ हजारांवर

googlenewsNext
ठळक मुद्देबुधवारी ८२ नव्या रुग्णांची वाढ जिल्ह्यात सध्या ४७८ रुग्णांवर सुरू उपचार

औरंगाबाद : जिल्ह्यात बुधवारी दिवसभरात ८२ कोरोना रुग्णांची भर पडली, तर ७८ जण कोरोनामुक्त झाले. उपचार सुरु असताना दोन रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यात आतापर्यंत आढळलेल्या एकूण रुग्णांची संख्या ४६ हजार ३१ झाली आहे. जिल्ह्यातील आतापर्यंत ४४ हजार ३४२ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, एक हजार २११ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या ४७८ रुग्णांवर उपचार सुरू आहेत. 

जिल्ह्यात नव्याने आढळलेल्या ८२ रुग्णांत मनपा हद्दीतील ६६, ग्रामीण भागातील १६ रुग्णांचा समावेश आहे. मनपा हद्दीतील ६७ आणि ग्रामीण भागातील ११, अशा एकूण ७८ रुग्णांना बुधवारी सुटी देण्यात आली. तेलवाडीतील ४५ वर्षीय पुरुष, अल्तमश कॉलनीतील ६० वर्षीय स्त्री कोरोनाबाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
जयभवानीनगर १, शिवशंकर कॉलनी १,भाग्यनगर १, सेंट फ्रान्सेस स्कूल १,बायजीपुरा १, उस्मानपुरा ४, पैठण गेट १, शहानूरवाडी २, पडेगाव १, एन सहा, सिडको १, उल्कानगरी १, पोद्दार इंटरनॅशनल स्कुल २, जटवाडा १, गुलमोहर कॉलनी १,धूत हॉस्पिटल ३,सातारा परिसर १,समर्थनगर १, शहानुरवाडी १, नवजीवन हॉस्पिटल परिसर १, सराफा भोवरी कोठडा १, एन-४, सिडको ४, न्यू गणेशनगर १, पुंडलिकनगर १, महालक्ष्मी चौक १, हर्सूल, टी. पॉईट ३, एन-८ येथे १, जिन्सी चौक १, गारखेडा १, अन्य २६

ग्रामीण भागातील रुग्ण
रांजणगाव १, पिंप्री राजा १, वडगाव १, अन्य १३

Web Title: Corona number of patients in Aurangabad district is over 46 thousand

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.