corona in Aurangabad : दिलासा !  शहरामध्ये फक्त ३२० तर ग्रामीणमध्ये ४८१ रुग्णांची वाढ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 4, 2021 11:42 AM2021-05-04T11:42:42+5:302021-05-04T11:47:03+5:30

corona in Aurangabad : जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांत घट होत असून सध्या १०,३०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

corona in Aurangabad: Consolation! An increase of only 320 in urban areas and 481 in rural areas | corona in Aurangabad : दिलासा !  शहरामध्ये फक्त ३२० तर ग्रामीणमध्ये ४८१ रुग्णांची वाढ

corona in Aurangabad : दिलासा !  शहरामध्ये फक्त ३२० तर ग्रामीणमध्ये ४८१ रुग्णांची वाढ

googlenewsNext
ठळक मुद्देउपचारानंतर रुग्णालयातून १५४७ जणांना सुटी १४ वर्षांच्या मुलासह ४२ रुग्णांचा मृत्यू

औरंगाबाद : जिल्ह्यात सलग दुसऱ्या दिवशी सोमवारी नव्या कोरोना रुग्णांची संख्या एक हजाराखाली राहिली. दिवसभरात ८०१ नव्या कोरोना रुग्णांची वाढ झाली. यात शहरातील अवघ्या ३२०, तर ग्रामीण भागामधील ४८१ रुग्णांचा समावेश आहे. दिवसभरात १५४७ रुग्ण उपचार घेऊन घरी परतले. गेल्या २४ तासांत जमुनानगर - जालना येथील १४ वर्षीय मुलासह ४२ रुग्णांचा मृत्यू झाला. यात औरंगाबाद जिल्ह्यातील ३१ आणि अन्य जिल्ह्यांतील ११ रुग्णांचा समावेश आहे.

जिल्ह्यात उपचार घेणाऱ्या रुग्णांत घट होत असून सध्या १०,३०० रुग्णांवर उपचार सुरू आहेत. जिल्ह्यात एकूण रुग्णांची संख्या १ लाख २६ हजार ९७७ झाली आहे. आतापर्यंत १ लाख १४ हजार ८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. आजपर्यंत २,५८८ रुग्णांचा मृत्यू झाला. मनपा हद्दीतील ६९६ आणि ग्रामीण भागातील ८५१ अशा १५४७ रुग्णांना सुटी देण्यात आली. नव्या रुग्णांची संख्या घटली. परंतु मृत्युदरात वाढ झाली असून, सोमवारी ३.८७ टक्के मृत्युदर राहिला.

उपचार सुरू असताना कन्नड येथील ४० वर्षीय पुरुष, ५५ वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ३५ वर्षीय पुरुष, ७० वर्षीय महिला व ७२ वर्षीय पुरुष, सेलूड, लाडसावंगी येथील ७० वर्षीय पुरुष, गोलटगाव येथील ६० वर्षीय महिला, बोरगाव येथील ४८ वर्षीय पुरुष, गांधेश्वर, खुलताबाद येथील ७५ वर्षीय महिला, फुलंब्रीतील ८० वर्षीय महिला, चितेगावातील ४५ वर्षीय पुरुष, पैठण येथील ७७ वर्षीय महिला, रामनगरातील ३६ वर्षीय पुरुष, भावसिंगपुरा येथील ६५ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ७२ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ७३ वर्षीय पुरुष, खंडाळा येथील ६८ वर्षीय पुरुष, कन्नड येथील ६८ वर्षीय पुरुष, माटेगाव येथील ८९ वर्षीय पुरुष, हर्सूल येथील ३६ वर्षीय पुरुष. सिल्लोड येथील ६५ वर्षीय महिला, हडकोतील ८० वर्षीय पुरुष, फुलंब्रीतील ७० वर्षीय पुरुष, बेगमपुरा येथील ७० वर्षीय पुरुष, मुकुंदवाडीतील ४२ वर्षीय महिला, सिल्लोड येथील ३० वर्षीय पुरुष, वैजापूर येथील ७२ वर्षीय पुरुष, बेगमपुरा येथील ४९ वर्षीय पुरुष, प्रतापनगर येथील ३३ वर्षीय महिला, एन-३ येथील ९० वर्षीय पुरुष, कामगार चौकातील ६५ वर्षीय महिला आणि अहमदनगर जिल्ह्यातील ५२ वर्षीय पुरुष, ६५ वर्षीय पुरुष, ४५ वर्षीय पुरुष, ३५ वर्षीय पुरुष, ६० वर्षीय पुरुष, ६० वर्षीय महिला, नाशिक जिल्ह्यातील ३८ वर्षीय पुरुष, हिंगोली जिल्ह्यातील ६५ वर्षीय पुरुष, लोणार-बुलढाणा येथील ३० वर्षीय पुरुष, जालना जिल्ह्यातील ६० वर्षीय महिला, जमुनानगर - जालना येथील १४ वर्षीय मुलाचा मृत्यू झाला.

मनपा हद्दीतील रुग्ण
एन-२, सिडको २, एन-७, सिडको १, एन-६, सिडको ५, एन-३, सिडको १, एन-९, सिडको २, एन-११, हडको २, एन-८, सिडको ६, एन-५, सिडको १, एन-१२ येथे १, मयुरपार्क, एअरपोर्ट १, सातारा परिसर ६, समर्थनगर १, मुर्तिजापूर, म्हाडा कॉलनी १, बायजीपुरा १, बसैयेनगर ४, न्यू हनुमाननगर १, शिवशंकर कॉलनी १, देवळाई परिसर ३, जवाहर कॉलनी १, देवानगरी १, कासलीवाल मार्वल १, कांचनवाडी २, नक्षत्रवाडी १, शिवाजीनगर २, बीड बाय पास परिसर ६, दर्गा रोड परिसर २, पहाडसिंगपुरा १, नंदनवन कॉलनी २, ओमसाईनगरी १, कॅनॉट प्लेस १, पिसादेवी २, औरंगपुरा २, संतोषी मातानगर १, संजयनगर १, जाधववाडी ३, सारा वैभव २, सावंगी ३, नारेगाव १, पेठेनगर ४, होनाजीनगर १, मिल कॉर्नर ३, हर्सूल ३, अशोकनगर १, सहकारनगर १, चाणक्यपुरी २, चिकलठाणा २, विशालनगर २, पोलीस कॉलनी १, पिसादेवी १, दत्तनगर १, जालाननगर १, उत्तमनगर १, वेदांतनगर २, उस्मानपुरा १, दिवाणदेवडी २, अन्य २१६.

ग्रामीण भागातील रुग्ण
इटखेडा १, पैठण २, फुलंब्री १, लाडगाव १, रांजणगाव १, बजाजनगर २, वडगाव १, सिडको महानगर-१ येथे २, तिसगाव सिडको १, अन्य ४६८.

Web Title: corona in Aurangabad: Consolation! An increase of only 320 in urban areas and 481 in rural areas

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.