संगणक टायपिंगचे परीक्षार्थी ताटकळत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 04:07 AM2021-03-04T04:07:41+5:302021-03-04T04:07:41+5:30

औरंगाबाद:ः शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेसाठी वेळेआधी केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना नियोजनाअभावी ताटकळत बसावे लागले. दुपारी अकरा वाजेचा पेपर एक ...

Computer typing test takers | संगणक टायपिंगचे परीक्षार्थी ताटकळत

संगणक टायपिंगचे परीक्षार्थी ताटकळत

googlenewsNext

औरंगाबाद:ः शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षेसाठी वेळेआधी केंद्रावर पोहोचलेल्या विद्यार्थ्यांना नियोजनाअभावी ताटकळत बसावे लागले. दुपारी अकरा वाजेचा पेपर एक वाजता सुरू झाला. तर मंगळवारी एका बॅचचा पेपर बुधवारी घेण्यात आला. विद्यार्थ्यांना अडचण आली; मात्र कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान झाले नसल्याचे शिक्षण विभागाकडून सांगण्यात आले.

महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेची शासकीय संगणक टायपिंग प्रमाणपत्र परीक्षा मंगळवारपासून सुरु झाली. २१ दिवस ही परीक्षा चालणार असून, परीक्षेसाठी जिल्ह्यातील ११ केंद्रांवरून ५ हजार ४१३ विद्यार्थी बसले आहेत. औरंगाबाद आणि यवतमाळ जिल्ह्यात परीक्षा होणार नसल्याचे परीक्षा परिषदेकडून स्पष्ट करण्यात आले होते. परीक्षेच्या अगोदरच्या दिवशी परीक्षेचे केंद्र शहरात देण्यात आली. मंगळवारनंतर बुधवारीही तांत्रिक अडचणींमुळे विद्यार्थ्यांना मनस्ताप झाला.

साई इन्स्टिट्यूट केंद्रावर सकाळी ११ वाजता मराठी ३० शब्द प्रति मिनीट व ४० शब्द प्रति मिनीट परीक्षेचे पेपर होणार होते; मात्र एक वाजेपर्यंत मराठी ३० शब्द प्रतिमिनीटचा पेपर घेण्यात आला नव्हता. यासंबंधी केंद्रप्रमुख म्हणाले की, केंद्रावर परीक्षा घेण्याबाबत कोणतीही तयारी नव्हती; मात्र अचानक परीक्षा घेण्याचे सांगितल्याने नियोजनाला वेळ मिळाला नाही. केंद्रावर परीक्षार्थींची संख्या जास्त आणि परीक्षेसाठी संगणक कमी, त्यामुळे एकाचवेळी नियोजित वेळेत परीक्षा घेता येत नसल्याचे सांगितले.

चौकट...

अडचण येऊ दिली नाही

तांत्रिक अडचणींमुळे काही वेळ उशिराने परीक्षा सुरू झाली; पण त्या परीक्षार्थ्यांच्या परीक्षा कालावधीत अडचण येऊ दिली नाही. ही परीक्षा दहावी बारावीसारखी नसून टायपिंग संदर्भातील वेगाची आहे, त्यामुळे कोणत्याही विद्यार्थ्यांचे नुकसान होणार नाही, याची काळजी घेतली गेली आहे.

-डाॅ. बी. बी.चव्हाण, शिक्षणाधिकारी.

Web Title: Computer typing test takers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.