नाईट कर्फ्यूचे नागरिकांकडून पालन; पोलीस सांगतात नियम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 1, 2021 04:04 AM2021-03-01T04:04:52+5:302021-03-01T04:04:52+5:30

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, नाईट कर्फ्यू लावून कोरोनाच्या शिरकावाला लगाम घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र ...

Compliance of citizens with night curfew; Police say the rules | नाईट कर्फ्यूचे नागरिकांकडून पालन; पोलीस सांगतात नियम

नाईट कर्फ्यूचे नागरिकांकडून पालन; पोलीस सांगतात नियम

googlenewsNext

औरंगाबाद : कोरोनाचा वाढता प्रभाव लक्षात घेता, नाईट कर्फ्यू लावून कोरोनाच्या शिरकावाला लगाम घालण्याचा प्रयत्न केला जात आहे. मात्र रस्त्यावर रात्री अकरा वाजल्यानंतर सामसूम दिसत असून, एखाद‌्दुसरे वाहन हे कामगारांची वाहतूक करणाऱ्या गाड्यांचे दिसत आहे. कोणीही रस्त्यावर फिरताना दिसत नाही. प्रमुख चौकांत वाहतुकीची सातत्याने गर्दी असलेल्या ठिकाणी चिटपाखरूही फिरताना दिसत नाही; कारण गतवर्षीच्या लॉकडाऊनमध्ये रस्त्यावर फिरणाऱ्यांना छडीचाचा मार पडल्याने यंदाच्या नाईट कर्फ्यूला शहरवासीयांनी मनावर घेतले आहे. जयभवानी नगर, गारखेडा परिसर, शहानूरमिया दरगाह, जालना रोडवरील दूध डेअरी चौक, मोंढा नाका, सेवन हिल, चिश्तीया चौक, बजरंग चौक, जळगाव रोड, सिडको बसस्थानक, मुकुंदवाडी, आदी ठिकाणी राईट कर्फ्यूचा रिॲलिटी चेक केला असता शुकशुकाट आढळून आला. रस्त्यांवर वाहतूक नव्हती; तर पोलिसांची नाईट राउंडची गाडी जयभवानी नगर आणि सिडको बसस्थानकाच्या परिसरात फिरताना दिसली. टीव्ही सेंटर चौकात बिट मार्शल आणि सिडको ठाण्याचे पथक मात्र ये-जा करणाऱ्यांची तपासणी करीत होते. नाईट कर्फ्यू असून, त्याचे पालन करा, अशी समज देताना ते आढळून आले.

गुन्हा कुठेही दाखल नाही

रस्त्यावर नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांची संख्या नगण्य असल्याने त्यांच्यावर कारवाई कशी करणार? त्यामुळे पोलीस गस्तीपथके आणि पोलीस दोघेही निवांत असताना दिसत आहेत. मंगळवारपासून लावलेल्या कर्फ्यूत फक्त दवाखान्यात जाणारे किंवा कामाहून घरी परतणाऱ्या कर्मचाऱ्यांशिवाय कुणी रस्त्यांवर दिसले नाही.

- शनिवारी रात्री अकरानंतर शहरात असणाऱ्या संचारबंदीचा रिॲलिटी चेक

- रात्री १२ वाजून ४० मिनिटांनी सूतगिरणीच्या चौकात एखादेदुसरे वाहन जाताना दिसले. शिवाजीनगरकडून गजानन मंदिराकडे जाणारा पूर्णपणे निर्मनुष्य होता. या ठिकाणी कुठलाही पोलीस बंदोबस्त नव्हता.

- मध्यरात्री १२ वाजून ५६ मिनिटांनी दूध डेअरी सिग्नलकडून काल्डा कॉर्नरकडे जाणारा रस्ता पूर्णपणे निर्मनुष्य होता. या ठिकाणी पोलीस बंदोबस्त नव्हता.

- चिस्तिया कॉलनी चौकात पहाटे १ वाजून १० मिनिटांनी तुरळक वाहतूक दिसली. या ठिकाणी पोलीस चौकी असतानाही कोणीही पोलीस कर्मचारी तिथे हजर नव्हता.

- टीव्ही सेंटर चौकात रात्री १ वाजून २२ मिनिटांनी सिडको पोलीस आणि बीट मार्शल यांनी येणाऱ्या-जाणाऱ्यांची चौकशी करून बिनाकामाचे घराबाहेर पडू नका, अशा सूचना दिल्या आणि रात्री अकरानंतर संचारबंदी लागू आहे, याची कल्पना दिली.

- रात्री १.३५ मिनिटांनी निर्मनुष्य जळगाव रोड

- रात्री १ वाजून ५५ मिनिटांनी मुकुंदवाडी येथे जालना रोडवर जड वाहतूक कंपनीचे कामगार यांच्याखेरीज समोरच मुकुंदवाडी पोलीस ठाणे असताना कोणीही पोलीस कर्मचारी येथे तैनात नव्हते.

- रात्री २ वाजून १० मिनिटांनी जयभवानी नगर येथील चौकात पोलीस कर्मचारी वाहनांची तपासणी करताना आढळले.

(छाया- सचिन लहाने)

Web Title: Compliance of citizens with night curfew; Police say the rules

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.