गंगापूर पंचायत समितीच्या दप्तर दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 8, 2021 04:06 AM2021-05-08T04:06:09+5:302021-05-08T04:06:09+5:30

ग्रामीण भागात वैद्यकीय, रोजगार हमी, कृषी, समाजकल्याण, महिला बालविकास व आरोग्य, शिक्षण आदी महत्त्वाची कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी जिल्हा ...

Citizens suffer due to delay in Gangapur Panchayat Samiti | गंगापूर पंचायत समितीच्या दप्तर दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त

गंगापूर पंचायत समितीच्या दप्तर दिरंगाईमुळे नागरिक त्रस्त

googlenewsNext

ग्रामीण भागात वैद्यकीय, रोजगार हमी, कृषी, समाजकल्याण, महिला बालविकास व आरोग्य, शिक्षण आदी महत्त्वाची कामे त्वरित मार्गी लावण्यासाठी जिल्हा परिषद व ग्रामपंचायत यांच्यातील महत्त्वाचा दुआ म्हणून पंचायत समितीची जबाबदारी असते. मात्र, गंगापूर पंचायत समितीच्या दप्तर दिरंगाईमुळे अनेक गांवचे ग्रामस्थ हैराण आहेत. सिंचन विहिरीच्या व रोजगार हमी योजनेतील फायली गत दहा महिन्यांपासून धूळखात पडल्या आहेत. ग्रामस्तरावरील अनेक कामे तोंड पाहून होतात तर ‘आर्थिक’धक्का दिल्याशिवाय वैयक्तिक फायली पुढेच सरकत नसल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. ग्रामीण जनतेला स्वच्छतेचा मूलमंत्र देणाऱ्या पंचायत समितीच्या सार्वजनिक स्वच्छतागृहाचीही दयनीय अवस्था झाली असल्याने आलेल्या नागरिकांची पंचाईत होत आहे. घाणीचे साम्राज्य पसरल्याने ग्रामीण भागातून येणाऱ्या नागरिकांची पंचाईत होत आहे. कृषी साहित्याचे वाटप बीओटी तत्त्वावर होत असल्याने कृषी साहित्याचे कोठार रिकामे असल्याने दुर्दशा झाली असून, त्याच्या छताचे पत्रे उडाले आहेत. सदरील कोठाराची दुरुस्ती करून देखभाल करणे गरजेचे आहे.

फोटो : गंगापूर पंचायत समितीच्या स्वच्छतागृहाची झालेली दुरवस्था.

070521\20210418_155200_1.jpg

गंगापूर पंचायत समितीच्या स्वच्छतागृहाची झालेली दुरवस्था.

Web Title: Citizens suffer due to delay in Gangapur Panchayat Samiti

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.