नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:07 AM2021-02-23T04:07:36+5:302021-02-23T04:07:36+5:30

गंगापूर : जिल्हाभर कोरोनाा रुग्ण वाढत असल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत आशा ...

Citizens should not believe rumors | नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

नागरिकांनी अफवांवर विश्वास ठेवू नये

googlenewsNext

गंगापूर : जिल्हाभर कोरोनाा रुग्ण वाढत असल्याने तालुक्यातील आरोग्य यंत्रणा कामाला लागली आहे. 'माझे कुटुंब, माझी जबाबदारी' मोहिमेंतर्गत आशा स्वयंसेविका, अंगणवाडी कर्मचारी व शिक्षकांद्वारे तालुक्यात यंत्रणा कामाला लागली आहे. संशयितांची प्राथमिक आरोग्य केंद्रात व उपजिल्हा रुग्णालयात कोरोना चाचणी करण्यात येणार असल्याचे तालुका आरोग्य यंत्रणेने सांगितले आहे.

मंगल कार्यालये व इतर अनावश्यक ठिकाणी नागरिकांनी गर्दी टाळावी. नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर दंडात्मक कारवाई करण्यात येणार आहे. खबरदारीची उपाययोजना म्हणून गंगापूर शहरात व वाळूज येथे एक, असे दोन कोविड सेंटर चालू करण्यात येणार आहेत. नागरिकांनी नियमित मास्कचा वापर करून कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये, असे आवाहन तहसील प्रशासनाने केले आहे.

ढोरेगावच्या जि. प. शाळेत एका शिक्षिकेला कोरोनाची लागण झाली. शाळेच्या मुख्याध्यापकांशी संपर्क केला असता त्यांनी सांगितले की, सदरील शिक्षिकेच्या पतींना कोरोना झाल्यामुळे त्या मागील काही दिवसांपासून शाळेत आल्या नाहीत. त्यांनी स्वतःची व दोन मुलांची चाचणी केली. त्यात कोरोना झाल्याचे समजले. त्यामुळे खबरदारी म्हणून आम्ही सर्व शिक्षकांनीदेखील चाचणी केली. त्यापैकी कोणालाही प्राथमिक लक्षणे आढळून आली नसल्याने शाळा नियमित सुरू राहील असे मुख्याध्यापकांनी सांगितले, तर शाळा बंद करण्याचा अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचे शालेय समिती अध्यक्षांनी सांगितले.

Web Title: Citizens should not believe rumors

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.