शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे अधिक; एक-दोन शिक्षकी शाळांचे हाल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 28, 2021 12:08 PM2021-01-28T12:08:15+5:302021-01-28T12:10:49+5:30

ZP School मूळ ज्या कामांसाठी नियुक्ती आहे तेच काम जर योग्य पद्धतीने करता येत नसेल तर त्याचा विचार शासनाने करायला हवा.

The burden of other work is more on the teacher than teaching; The condition of one or two teacher schools | शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे अधिक; एक-दोन शिक्षकी शाळांचे हाल

शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे अधिक; एक-दोन शिक्षकी शाळांचे हाल

googlenewsNext
ठळक मुद्देविद्यार्थ्यांच्या शिक्षणाकडे होतेय दुर्लक्षजिल्हा परिषद शाळांतील स्थिती अध्यापनाव्यतिरिक्त ३६ प्रकारचे कामे 

औरंगाबाद : जिल्हा परिषद शिक्षकांवर शिकविण्यापेक्षा इतर कामांचेच ओझे जास्त आहे. त्याचा परिणाम थेट विद्यार्थ्यांच्या गुणवत्तेवर होत असून इंग्रजी शाळांकडे पालकांचा ओढा वाढला आहे. केवळ शिक्षण आणि अध्यापनावर शिक्षण विभागाने लक्ष केंद्रीत केल्यास व इतर कामांसाठी स्वतंत्र यंत्रणा उभारल्यास शिक्षणाची गुणवत्ता सुधारेल असा सूर विविध शिक्षक संघटनांतून उमटत आहे.

राष्ट्रीय पातळीवर जनगणना आणि निवडणुकीची कामे शिक्षकांनी स्विकारली आहे. मात्र, त्याशिवाय बांधकाम, शिक्षकेतर कर्मचाऱ्यांची कामे, अनेक वेळी मतदार पुनर्निरीक्षण, बीएलओ या कामांना शिक्षकांचा विरोध असताना शिक्षकांना त्या कामात जुंपले जाते. या कामांमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणावर, अध्ययन अध्यापनावर परिणाम होतो. मूळ ज्या कामांसाठी नियुक्ती आहे तेच काम जर योग्य पद्धतीने करता येत नसेल तर त्याचा विचार शासनाने करायला हवा. शिक्षकांना काही कामांसाठी मानधन मिळते. ते मानधन सुशिक्षित बेरोजगारांना देऊन त्यांच्याकडून ही कामे करून घेतल्यास त्यांनाही लाभ होईल आणि कामाचा बोझाही शिक्षकांवर येणार नाही. अन्यथा त्यासाठी पर्यायी व्यवस्था शासनाने निर्माण करायला पाहिजे, असे शिक्षक भारतीचे जिल्हाध्यक्ष प्रकाश दाणे यांनी सांगितले.

७४ एक शिक्षकी शाळांचे हाल
जिल्ह्यात ७४ शाळा एक शिक्षकी आहेत. त्यात शिक्षकेतर पदे भरण्यावरील बंदी आणि रिक्त पदांमुळे शिक्षकांवर सर्वच वर्गांची जबाबदारी तर दोन शिक्षकी शाळांचीही मोठी संख्या असल्याने एक शिक्षक शिक्षकेतर कामांत अडकून असतो तेथील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होत आहे.

शासकीय योजनांचा भार
- शिक्षकांना मतदार यादी, पशु, गाव, आरोग्य असे अनेक प्रकारचे सर्वे, जनजागृती मोहिमा, जनगणना अशी अनेक कामे करावी लागतात. या कामांसाठीच एक शिक्षक पूर्णवेळ लागतो.
- पोषण आहार, धान्य वाटप आणि त्यासोबत त्याचे १२ प्रकारचे रेकाॅर्ड ठेवणे, निवडणुकीची कामे, आरोग्य विभागाचे लसीकरण, गावातील आजारी, वृद्ध, बालकांचे सर्वेक्षण, गोळ्या औषधांचे वाटप, कृषी विभागाची कामे, प्रत्येक नव्या उपक्रमांत शिक्षक केंद्रस्थानी असतो.
- कोरोना काळातही शिक्षकांना कामे होतीच. शाळेच्या काळात अशी कामे लावल्यावर त्या शिक्षकाने अध्यापन कधी करावे, असा सवाल शिक्षक संघटनांनी केला.

अध्यापनाव्यतिरिक्त ३६ प्रकारचे कामे 
शिक्षकांना अध्यापनाव्यतिरिक्त ३६ प्रकारचे कामे करावी लागतात. ग्रामीण भागातील विद्यार्थी शिक्षणावर त्याचा परिणाम होतो. गुणवत्तेचे शिक्षण विद्यार्थ्यांना मिळण्यासाठी शिक्षकांवर अतिरिक्त कामांचे ओझे नको.
- विजय साळकर, जिल्हाध्यक्ष, शिक्षक समिती

शिक्षक शासकीय कर्मचारी आहे. त्याला शिक्षणाव्यतिरिक्त कामे दिली गेली तर ते करतात. मात्र, शिक्षक मूळ ज्या कामासाठी नेमला त्या अध्यापनावर त्याचा प्रतिकुल परिणाम होऊ नये. यासाठी प्रयत्न करत आहोत.
- सूरजप्रसाद जयस्वाल, शिक्षणाधिकारी

२,१३१ जिल्हा परिषदेच्या शाळा
८,५०३ जिल्हा परिषद शिक्षकांची संख्या
२,१७,८१३ जि. प. शाळा विद्यार्थी संख्या

Web Title: The burden of other work is more on the teacher than teaching; The condition of one or two teacher schools

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.