बजाजनगरात संत निरंकारी मंडळातर्फे रक्तदान शिबिर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:06 AM2021-05-11T04:06:03+5:302021-05-11T04:06:03+5:30

संत निरंकारी मंडळातर्फे दरवर्षी २४ एप्रिलला मानव एकता दिवस साजरा करण्यात येतो. मंडळाचे सदगुरू बाबा गुरुबचनसिंहजी यांनी मानवतेसाठी बलिदान ...

Blood donation camp by Sant Nirankari Mandal in Bajajnagar | बजाजनगरात संत निरंकारी मंडळातर्फे रक्तदान शिबिर

बजाजनगरात संत निरंकारी मंडळातर्फे रक्तदान शिबिर

googlenewsNext

संत निरंकारी मंडळातर्फे दरवर्षी २४ एप्रिलला मानव एकता दिवस साजरा करण्यात येतो. मंडळाचे सदगुरू बाबा गुरुबचनसिंहजी यांनी मानवतेसाठी बलिदान दिल्याने त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यासाठी विश्वभरात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात येते. बजाजनगरातील जागृत हनुमान मंदिर परिसरात सदगुरू माता सुदीक्षाजी महाराज यांच्या मार्गदर्शनाखाली या रक्तदान शिबिराचे आयोजन केले होते. शिबिराचे उद्घाटन उद्योजक हनुमान भोंडवे, चंद्रशेखर कुरणे यांच्या उपस्थितीत करण्यात आले. यावेळी शासकीय रक्तपेढीच्या डॉक्टर व कर्मचाऱ्यांनी रक्तसंकलनाचे कार्य केले. शिबिर यशस्वीतेसाठी संत निरंकारी मंडळाचे विभागीय प्रमुख कन्हय्यालाल डेब्रा, वाळूज शाखेचे शिवाजी कुबडे व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतले.

फोटो ओळ- बजाजनगरात संत निरंकारी मंडळाच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिराच्या उद्घाटन करताना मान्यवर व मंडळाचे पदाधिकारी, दुसऱ्या छायाचित्रात रक्तदान करताना दाते.

----------------------------

Web Title: Blood donation camp by Sant Nirankari Mandal in Bajajnagar

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.