नाचनवेल येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:07 AM2021-02-23T04:07:30+5:302021-02-23T04:07:30+5:30

कन्नड तालुक्यातील जनतेने गेल्या वीस वर्षांपासून आपल्यावर भरभरून प्रेम केले असून आता त्या उपकारांची परतफेड करण्याची वेळ आली आहे. ...

Bhumi Pujan of Social Hall at Nachanvel | नाचनवेल येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

नाचनवेल येथे सामाजिक सभागृहाचे भूमिपूजन

googlenewsNext

कन्नड तालुक्यातील जनतेने गेल्या वीस वर्षांपासून आपल्यावर भरभरून प्रेम केले असून आता त्या उपकारांची परतफेड करण्याची वेळ आली आहे. तालुक्यात सर्वदूर विकासकामे पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रतिपादन आ. राजपूत यांनी यावेळी केले. ग्रामस्थांनी यावेळी शंभर एकर जमीनीवर सौर ऊर्जा प्रकल्प उभारण्याची मागणी सर्वपक्षीय कार्यकर्त्यांकडून करण्यात आली. यावेळी सरपंच छायाबाई थोरात, संजय पिंपळे, सचिन शिंदे, विठ्ठल थोरात, कैलास राजपूत, कारभारी पवार, राजेंद्र गाडेकर, वसंत भोसले, शिवाजी थोरात, पुनमचंद राजपूत, भूषण शिंदे, अलिम शहा, राजधर शिंदे, कैसर शहा, गणेश सुरडकर, अशोक थोरात आदी नागरिक उपस्थित होते.

फोटो कॅप्शन : नाचनवेल येथील सभागृहाचे भूमीपूजन करताना आमदार उदयसिंग राजपूत.

220221\vijay thorat_img-20210221-wa0008_1.jpg

नाचनवेल येथील सभागृहाचे भूमीपूजन करताना आमदार उदयसिंग राजपूत.

Web Title: Bhumi Pujan of Social Hall at Nachanvel

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.