शासन निर्देशानुसारच साजरी होणार भीमजयंती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 9, 2021 04:06 AM2021-04-09T04:06:06+5:302021-04-09T04:06:06+5:30

औरंगाबाद : शासन निर्देशानुसारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला. विश्वभूषण डॉ. ...

Bhim Jayanti will be celebrated as per government directives | शासन निर्देशानुसारच साजरी होणार भीमजयंती

शासन निर्देशानुसारच साजरी होणार भीमजयंती

googlenewsNext

औरंगाबाद : शासन निर्देशानुसारच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती साजरी करण्याचा निर्णय शांतता समितीच्या बैठकीत घेण्यात आला.

विश्वभूषण डॉ. आंबेडकरांच्या १३० व्या जयंतीनिमित्त पैठणगेट येथील पोलीस उपायुक्त परिमंडळ-१ कार्यालयात पोलीस प्रशासन व आंबेडकरी अनुयायांची संयुक्त बैठक पोलीस उपायुक्त निकेश खाटमोडे यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. सहा. पोलीस आयुक्त भापकर, पोलीस निरीक्षक सचिन सानप, माजी उपमहापौर प्रकाश निकाळजे, दिनकर ओंकार, श्रावण गायकवाड, गौतम खरात, मुकुंद सोनवणे, दौलतराव मोरे यांची प्रमुख उपस्थिती होती.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर भीमजयंतीचा सोहळा हा शासन निर्देशानुसार साजरा करावा, गर्दी टाळून घरातूनच कौटुंबिक जयंती साजरी करावी यावर आंबेडकरी अनुयायांनी सहमती दर्शवली.

भीमजयंती म्हणजे केवळ जल्लोष हा गैरसमज करण्यात येतो. वास्तविक मागील अनेक वर्षांपासून समाजहिताच्या उपक्रमांनी, प्रबोधनात्मक कार्यक्रमांनी भीमजयंती साजरी करण्याची परंपरा आंबेडकरी समूहाने जपली असून, यंदाही कोरोनाच्या परिस्थितीला धीराने तोंड देण्याकरिता शासनाच्या निर्देशांचे काटेकोर पालन करत लोकोपयोगी उपक्रमांची सांगड घालत भीमजयंती साजरी करू, कुठल्याही प्रकारे कोरोनाचा संसर्ग होणार नाही, असे उपक्रम राबविण्यावर आमचा भर असेल, असा एकमताचा निर्णय जाहीर करण्यात आला.

शासनाने काही वेळ निर्देश शिथिल करून जयंतीच्या सजावटीचे साहित्य, फुल- हार खरेदीसाठी वेळ द्यावा, भडकलगेट येथे नियम व अटीआधारे अभिवादन करण्याची परवानगी द्यावी, गर्दी टाळण्यासाठी भडकलगेट ते टाऊन हॉल व मिल कॉर्नरपर्यंत १ मीटरचे अंतर राखून मार्किंग करावी, शासनाने जर परवानगी दिली नाही अथवा निर्बंध कडक केल्यास नागरिकांच्या वतीने जिल्हाधिकारी, पोलीस आयुक्त, पोलीस अधीक्षक, मनपा प्रशासकांनी अभिवादन करावे, भडकलगेट व शहरातील सर्व महापुरुषांच्या पुतळ्यांची स्वच्छता करण्यात यावी, शहरातील डॉ. बाबासाहेबांच्या पुतळ्यांची सजावट, स्वच्छता, रंगरंगोटी, विद्युत रोषणाई करण्यात यावी, अशा सूचना कार्यकर्त्यांनी केल्या. नागराज गायकवाड, संदीप शिरसाठ, डॉ. जमील देशमुख, योगेश बन, अरुण बोर्डे, सचिन निकम, गुणरत्न सोनवणे, विजय वाहूळ, मुकुल निकाळजे, आनंद कस्तुरे, शैलेंद्र मिसाळ, श्रीरंग ससाणे, सिद्धाेधन मोरे, बाळूभाऊ वाघमारे, सोनू नरवडे, कपिल बनकर, पंकज बनसोडे, प्रथम कांबळे, राहुल मकासरे, राहुल खंडागळे, जयश्री शिर्के, सचिन शिंगाडे, प्रेम सोनवणे आदींची उपस्थिती होती.

Web Title: Bhim Jayanti will be celebrated as per government directives

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.