बारकोड, लिंकद्वारे होणार शाळाप्रवेश निश्चित

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:06 AM2021-05-11T04:06:01+5:302021-05-11T04:06:01+5:30

वाळूज महानगर : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत वडगाव जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी अभिनव ...

Barcode, school admission will be through link | बारकोड, लिंकद्वारे होणार शाळाप्रवेश निश्चित

बारकोड, लिंकद्वारे होणार शाळाप्रवेश निश्चित

googlenewsNext

वाळूज महानगर : आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत वडगाव जिल्हा परिषद शाळेच्या वतीने आगामी शैक्षणिक वर्षात विद्यार्थ्यांच्या शाळा प्रवेशासाठी अभिनव उपक्रम राबविण्यात सुरुवात केली आहे. बारकोड व लिंकद्वारे विद्यार्थ्यांचे शाळेतील प्रवेश निश्चित होणार असल्याने कोरोना काळात पालक व विद्यार्थ्यांची डोकेदुखी थांबणार आहे.

कोरोनाच्या संकटामुळे अडचणीत सापडलेल्या पालक व विद्यार्थ्यांची मदतीसाठी वडगाव कोल्हाटी जि.प. शाळेच्या शिक्षकांनी पुढाकार घेतला आहे. मुख्यध्यापक सुनील चिपाटे, तंत्रस्रेही शिक्षक सचिन वाघ आदींनी समाज माध्यम व आधुनिक कार्यपद्धतीचा अवलंब करून नवीन शैक्षणिक वर्षात प्रवेश प्रकिया राबविण्याचा संकल्प हाती घेतला आहे. शाळा प्रवेशासाठी गुगल फॉर्म लिंकद्वारे अथवा बारकोड स्कॅन करून घरबसल्या भरून द्यायचा आहे. ऑनलाइन पद्धतीने विद्यार्थ्यांचा तात्पुरत्या स्वरूपात प्रवेश निश्चित होणार आहे. प्रवेश निश्चित केलेल्या विद्यार्थ्यांच्या घरी जाऊन मुख्याध्यापक व शिक्षक मूळ प्रवेश अर्ज व सोबत जोडलेली पुराव्याची कागदपत्रे जमा करणार आहेत. बारकोडच्या सांक्षाकित प्रती गावात सार्वजनिक व वर्दळीच्या ठिकाणी भिंतीवर डकविण्यात येणार आहे. या अर्जात शाळेचा यू डायस क्रमांक, शाळा उघडण्याची तारीख, पालकाचा संपर्क क्रमांक, शाळा प्रवेशासाठी वयाची अट, तांत्रिक अडचणी दूर करण्यासाठी संपर्क क्रमांक आदी माहिती असणार आहे. आगामी नवीन शैक्षणिक वर्षात वडगाव जि.प. शाळेत प्रवेशासासाठी मुख्याध्यापक सुनील चिपाटे, सहशिक्षक सचिन वाघ, शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष ज्ञानेश्वर साळे आदी पालकांत जनजागृती करीत आहे.

फोटो ओळ

वडगाव जि.प.शाळेच्यावतीने ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची जनजागृती करताना मुख्याध्यापक सुनील चिपाटे, सिचन वाघ आदी.

Web Title: Barcode, school admission will be through link

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.