आंतरविद्यापीठ स्पर्धेत औरंगाबादच्या सपना ढमाले हिला गोल्ड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2019 12:47 AM2019-02-16T00:47:30+5:302019-02-16T00:47:58+5:30

मुंबईत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्समध्ये जबरदस्त कामगिरी करताना ५ पदकांची लूट केली. त्यात सपना ढमाले हिने महिलांच्या १00 मीटर धावण्याच्या शर्यतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.

Aurangabad's dream dhamale shila gold | आंतरविद्यापीठ स्पर्धेत औरंगाबादच्या सपना ढमाले हिला गोल्ड

आंतरविद्यापीठ स्पर्धेत औरंगाबादच्या सपना ढमाले हिला गोल्ड

googlenewsNext
ठळक मुद्देडॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाने जिंकली ५ मेडल्स : स्नेहल हारदे, अनिल घुसिंगे यांना रौप्य, पूनम कळेल, प्रमोद काळे यांना कास्य

औरंगाबाद : मुंबईत सुरु असलेल्या महाराष्ट्र राज्य आंतरविद्यापीठ क्रीडा स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या खेळाडूंनी अ‍ॅथलेटिक्समध्ये जबरदस्त कामगिरी करताना ५ पदकांची लूट केली. त्यात सपना ढमाले हिने महिलांच्या १00 मीटर धावण्याच्या शर्यतीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले.
स्नेहल हारदे हिने उंच उडीत आणि अनिल घुसिंगे याने भालाफेकमध्ये रौप्यपदकांची कमाई केली. पूनम कळेल आणि प्रमोद काळे यांनी अनुक्रमे लांब उडी व गोळाफेकमध्ये कास्यपदकाची कमाई केली.
सपना ढमाले हिने महिलांच्या १00 मीटर धावण्याच्या शर्यतीत १२.३ सेकंद वेळ नोंदवताना सुवर्णपदक जिंकले. पुण्याच्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाच्या अंकिता गोसावीने १२.५ सेकंदांसह रौप्य व पुण्याच्याच उज्ज्वला सानपने १३.१ सेकंद वेळ नोंदवत कास्यपदक जिंकले.
स्नेहल हारदे हिने उंच उडीत आणि पुरुषांमध्ये अनिल घुसिंगे याने भालाफेकमध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला प्रत्येकी १ रौप्यपदक जिंकून दिले. लांब उडीत पूनम कळेल हिने कास्यपदक जिंकले. कोल्हापूरच्या प्रगती सकपाळने सुवर्ण व पुण्याच्या तृप्ती चितळेने रौप्यपदक पटकावले. पदकविजेत्या खेळाडूंना प्रशिक्षक सुरेंद्र मोदी, नितीन निरावणे यांचे मार्गदर्शन लाभले. या यशाबद्दल डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे कुलगुरु बी. ए. चोपडे, प्र. कुलगुरु अशोक तेजनकर, क्रीडा संचालक डॉ. दयानंद कांबळे, कुलसचिव प्रो. साधना पांडे यांनी खेळाडूंचे अभिनंदन केले आहे.

Web Title: Aurangabad's dream dhamale shila gold

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.