औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजाराच्या घरात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 2, 2020 01:09 PM2020-07-02T13:09:50+5:302020-07-02T13:22:58+5:30

तपासणीचा उच्चांक : १२०० पैकी २०६ पॉझिटिव्ह 

In Aurangabad, the number of corona victims is around 6,000 | औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजाराच्या घरात

औरंगाबादेत कोरोनाबाधितांचा आकडा ६ हजाराच्या घरात

googlenewsNext
ठळक मुद्दे२८६० रुग्णांवर उपचार सुरु२८५७ कोरोनामुक्त

औरंगाबाद ः जिल्ह्यातील कोरोनाबाधितांची संख्या सहा हजारांच्या घरात पोहचली आहे. सलग द्विशतकी वाढ सुरुच असुन आतापर्यंत सर्वात उच्चांकी तपासणीची नोंदही झाली आहे. बुधवारी करण्यात आलेल्या १२०० स्वॅबच्या संकलनातून २०६ रुग्णांना कोरोनाचे निदान झाले आहे. यात महापालिका हद्दीत १७१ तर ग्रामीण भागात ३५ रुग्ण आढळून आले. 
 
गुरुवारी सकाळी २०६ कोरोनाबाधित रुग्णांची वाढ झाली.  त्यामध्ये १२२ पुरुष तर ८३ महिला व अन्य एकाचा समावेश आहे. आतापर्यंत एकूण ५९८८ कोरोनाबाधित आढळले असून २८५७ बाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले. तर आजपर्यंत २७१ बाधितांचा उपचारादरम्यान मृत्यु झाल्याने २८६० रुग्णांवर उपचार सुरु असल्याचे प्रशासनाने कळवले आहे. 

मनपा हद्दीत आढळले १७१ रुग्ण 

सिडको १, गजानन नगर, गारखेडा १, काबरा नगर, गारखेडा १, फुले नगर, उस्मानपुरा १, नारळीबाग २, पुंडलिक नगर ४, सिडको एन-अकरा ३, मिसरवाडी २, शिवाजी नगर ६, सुरेवाडी १, जाधववाडी ५, सातारा परिसर ३, छावणी ५, द्वारकापुरी, एकनाथ नगर ६, आयोध्या नगर २, नवनाथ नगर १,  रायगड नगर २, उल्कानगरी १, शिवशंकर कॉलनी १०, एन बारा टी व्ही सेंटर ३, पोलिस कॉलनी, पडेगाव ५, बेगमपुरा १, मेडिकल क्वार्टर परिसर १, रवींद्र नगर २, पडेगाव २, बायजीपुरा ३, समता नगर १, मयूर पार्क १, नागेश्वरवाडी १, रोकडिया हनुमान कॉलनी १, कृष्णा नगर, बीड बायपास १, ज्योती नगर १, एन सात सिडको, बजरंग चौक २, हनुमान नगर ७, उस्मानपुरा २, भोईवाडा २, बन्सीलाल नगर १, कुंभारवाडा २, रमा नगर १, शांतीनिकेतन कॉलनी १, भाग्य नगर १०, सौजन्य नगर १, कांचनवाडी १३, नाथ नगर ३, राहुल नगर ६, देवळाई परिसर १, हायकोर्ट परिसर १, राम नगर १, नवजीवन कॉलनी १, अल्तमश कॉलनी १, ठाकरे नगर ३, एन दोन सिडको १, एन सहा सिडको २, सावंगी हॉस्पीटल परिसर १, सावंगी, हर्सुल २, न्याय नगर १, एन नऊ सिडको २, विशाल नगर ३, एसटी कॉलनी ६, सेव्हन हिल १, गांधी नगर १, गुरु सहानी नगर १, टीव्ही सेंटर १, सदाशिव नगर १, एकनाथ नगर १, खोकडपुरा १, मुकुंदवाडी १, द्वारकानगरी, एन अकरा १, एन बारा, हडको २, नूतन कॉलनी १, अन्य १ रुग्ण शहर परिसरात आढळून आले.

ग्रामीण भागात ३५ रुग्ण 
शिवाजी नगर, वाळूज १, शरणापूर २, चिरंजीव सो,लोकमान्य चौक, बजाज नगर ३, सिडको महानगर २, कमलापूर, बजाज नगर १, जीएम नगर, रांजणगाव १, एसटी कॉलनी, बजाज नगर १, पाण्याच्या टाकीजवळ, बजाज नगर १, म्हाडा कॉलनी, बजाज नगर १, आयोध्या नगर, बजाज नगर १, अनिकेत सो., बजाज नगर १, चिंचबन कॉलनी १, नागापूर कन्नड १ कोहिनूर कॉलनी १, गंगापूर माळूंजा १, वाळूज गंगापूर ३, अरब गल्ली गंगापूर ३, दर्गाबेस वैजापूर १० या भागातील कोरोनाबाधित आहेत.

Web Title: In Aurangabad, the number of corona victims is around 6,000

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.