प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी गजाआड, पण अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरीत...

By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2021 10:52 AM2021-10-20T10:52:30+5:302021-10-20T10:52:48+5:30

चौकशीत अल्पवयीन मुलाने खूनाची कबुली दिली आणि हत्यारं घराजवळील विहिरीत टाकल्याचे सांगितले.

Aurangabad news, Rajan Shinde murder case, killer caught but many questions remain unanswered | प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी गजाआड, पण अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरीत...

प्रा. राजन शिंदे यांचा मारेकरी गजाआड, पण अद्याप अनेक प्रश्न अनुत्तरीत...

googlenewsNext

औरंगाबाद: शहरातील उच्चवर्गीय वसाहतीत राहणाऱ्या प्रा. राजन शिंदे यांचा खून चोरीच्या उद्देशाने झाला असावा, असा प्राथमिक अंदाज लावण्यात आला होता. पण, घरातून एकही वस्तू चोरीला गेली नाही आणि कुटुंबातील इतर सदस्यांना धक्काही लागला नाही. या परिस्थितीवरुन पोलिसांना वेगळाच वास आला. यानंतर पोलिसांनी वेगळ्या दिशेने तपास सुरू केला. प्रा. राजन शिंदे यांचे शहरात मोठे नाव होते, म्हणून स्वतः पोलिस आयुक्त डॉ. निखिल गुप्ता यांनी या प्रकरणाचा तपास आपल्या हाती घेतला. 

पोलिसांसमोर पुरावा शोधण्याचे मोठे आवाहन
या प्रकरणाच्या तपासात पोलिसांना ठोस पुरावे मिळत नव्हते. घरात कुठेही घरच्यांव्यतिरिक्त मारेकऱ्याच्या हाताचे, पावलांचे ठसे नव्हते. झटापट झाल्याच्या खुणाही नव्हत्या. तसेच, राजन शिंदे यांच्या पत्नी मनीषा शिंदे आणि इतर सदस्यांनाही काहीच कळाले नाही किंवा आवाज आला नाही. या सर्व गोष्टीमुळे पोलिसांचा कुटुंबियांवर संशय बळावला. यानंतर मोठ्या चौकशीअंती अल्पवयीन मुलाने खूनाची कबुली दिली आणि हत्यारं घराजवळील विहिरीत टाकल्याचे सांगितले. 

...पण अनेक प्रश्न अनुत्तरीत
सर्व तपासानंतर पोलिसांनी 18 ऑक्टोबरला घटनेचा उलगडा केला. विहिरीतील पाणी काढून डंबेल, चाकू आणि रक्ताने माखलेला टॉवेल जप्त करण्यात आला. पण, अद्याप घटनेचा संपूर्ण उलगडा झालाच नाही. प्रा. राजन शिंदेंवर हल्ला होताना त्यांच्या पत्नी, मुलगी, आई-वडिलांना काहीच कसं कळालं नाही? त्यांना कुठलाच आवाज किंवा झटापटीचा आवाज आला नाही का ? प्रकरण कळालं तरी ते शांत कसे आहेत? त्यांनी आरोपीला अडवले का नाही ? शिंदेंची घरात वागणूक कशी होती? अशा अनेक प्रश्नांची उत्तरे अजून पोलिसांना मिळालेली नाहीत. हे प्रकरण वाटतं तितकं सरळं आणि सोपं नाही. कारण आरोपीने खूनाची कबुली दिली असली तरी, गुन्ह्यात त्याचा एकट्याचा सहभाग होता की, अजून कोणी त्याला मदत केली ? याचाही शोध लावणं महत्वाचं आहे.
 

Web Title: Aurangabad news, Rajan Shinde murder case, killer caught but many questions remain unanswered

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.