औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या २७ हजार ७१२ वर; एकूण मृत्यू ७९२

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 12, 2020 02:51 PM2020-09-12T14:51:05+5:302020-09-12T14:58:20+5:30

शुक्रवारी ४२३ बाधितांची भर, तर उपचारादरम्यान १३ रुग्णांचा मृत्यू

Aurangabad district has 27 thousand 712 corona patients; Total deaths 792 | औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या २७ हजार ७१२ वर; एकूण मृत्यू ७९२

औरंगाबाद जिल्ह्याची कोरोना रुग्णसंख्या २७ हजार ७१२ वर; एकूण मृत्यू ७९२

googlenewsNext
ठळक मुद्देजिल्ह्यात २१,२१० कोरोनामुक्त सध्या ५,७१० रुग्णांवर उपचार सुरू

औरंगाबाद :  जिल्ह्यात ४२३ रुग्णांची नव्याने भर पडली. जिल्ह्यातील १०, तर अहमदनगर, वाशिम, जालना येथील प्रत्येकी एका बाधिताचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. दिवसभरात ५०६ जणांना सुटी देण्यात आली. त्यात शहरातील ४१४, तर ग्रामीण भागातील ९२ जणांचा समावेश असल्याची माहिती शुक्रवारी जिल्हा प्रशासनाकडून देण्यात आली.

आजपर्यंत २१,२१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या २७ हजार ७१२ झाली असून, आजपर्यंत एकूण ७९२ जणांचा मृत्यू झाल्याने ५,७१० रुग्णांवर उपचार सुरू आहे. अँटिजन टेस्टद्वारे केलेल्या तपासणीत सिटी एन्ट्री पॉइंटवर ९२, मोबाईल स्वॅब कलेक्शन पथकास १०२ आणि ग्रामीण भागात ४८ रुग्ण आढळलेले आहेत.

ग्रामीण भागात १४५ रुग्ण
साठेनगर, वाळूज १, वडगाव कोल्हाटी १, केकतजळगाव, पैठण १, टाकळी सागज, वैजापूर १, बाबरा, फुलंब्री १, औराळा, कन्नड १, विटा कन्नड १, रोटे वस्ती, वैजापूर १, अन्नपूर्णानगर, पैठण १, देवगिरीनगर, बजाजनगर १, जयभवानी कॉलनी, बजाजनगर १, जयभवानी चौक, भाजीमंडई परिसर, बजाजनगर १, गोदावरी सो., बजाजनगर १, मनीषानगर, वाळूज १, गणेशनगर, वाळूज २, शिवाजी चौक, विटावा २, न्यू हनुमाननगर, वाळूज १, देवगिरी कॉलनी, रांजणगाव २, मारुतीमंदिर, कासोदा १, पिशोर ५, शिऊर १, तितरखेडा लोणी १, हस्ता, कन्नड २, करमाड २, खुलताबाद २, पाचोड ५, रामनगर, पैठण २, नाथविहार,पैठण १, नारळा, पैठण ५, पीठ उंबर गल्ली, पैठण २, पिंपळवाडी, पैठण १, शिवनगर, पैठण १, इसारवाडी, पैठण १, रेहाना कॉलनी, गंगापूर १, लासूर स्टेशन २, शिक्षक कॉलनी, गंगापूर १, जामगाव, गंगापूर १०, लासूर रोड, गंगापूर ४, लखमापूर, गंगापूर १, बगडी, गंगापूर १, समतानगर, गंगापूर १, शिवराई, गंगापूर १, सोनार गल्ली, गंगापूर १, उपजिल्हा रुग्णालय परिसर, गंगापूर २, लक्ष्मी कॉलनी, गंगापूर १, भवन, सिल्लोड १, टिळकनगर, सिल्लोड १, उकडगाव, वैजापूर २, आंबेडकरनगर, वैजापूर १, फुलेवाडी, वैजापूर १, व्यंकटेशनगर, वैजापूर १, म्हसोबा चौक, वैजापूर १, अगरसायगाव २, भारतवाडी, टाकळी सागज २, बोराड वस्ती, हिलालपूर ६, औरंगाबाद १९, फुलंब्री १, गंगापूर ३, कन्नड ४, सिल्लोड १०, वैजापूर ४, पैठण ४, सोयगाव ३.

मनपा हद्दीत ८४ रुग्ण
पैठणगेट १, देवानगरी १, घाटी परिसर १, अन्य ४, बुढीलेन १, नॅशनल कॉलनी १, शिवज्योती कॉलनी १,  सुधाकरनगर १, रचनाकर कॉलनी ४, वेदांतनगर ४, गांधीनगर १, बन्सीलालनगर ६, क्रांतीचौक पोलिस स्टेशन परिसर १, लालमन कॉलनी ३, पदमपुरा १, सारा प्रभावती सो., सावंगी १, बालाजीनगर १, सावंगी १, उस्मानपुरा १, एन-९ सिडको १, प्रतापनगर १, स्रेहवर्धिनी कॉलनी, जवाहरनगर १, कासलीवाल मार्बल, बीड बायपास १, सातारा पोलिस स्टेशन परिसर १, उत्तमनगर, जवाहर कॉलनी १, आॅरेंज सिटी, सातारा परिसर २, एचपी गॅस एजन्सी, सातारा परिसर १, सहकारनगर २,  भारतमातानगर १, एन-१२ हडको १, एन-९ शिवनेरी कॉलनी १, एन-७, पोस्ट आॅफिसजवळ २, पारिजातनगर २, एन-२ न्यू एस.टी. कॉलनी १, एन-१२ भारतमातामंदिर १, एन-११ सुदर्शननगर १, कैलाशनगर १, मिटमिटा २, संजयनगर १, देवळाई परिसर ३, जयभवानीनगर १, एन-१२ टीव्ही सेंटर १, गारखेडा परिसर २, देशमुखनगर १, चुनाभट्टी १, पुंडलिकनगर १, तारांगणनगर ३, राधास्वामी कॉलनी १, एन-२ सिडको १, रामनगर १, मयूरपार्क १, मुकुंदवाडी १, मिलिटरी हॉस्पिटल १, हर्सूल २, हर्सूल सावंगी १, सिडको १, सौजन्यनगर, बालाजीनगर १. नागरिकांनी नियमांचे पालन करण्याचे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.


सिटी एन्ट्री पॉइंट ९२ रुग्ण
वाळूज एमआयडीसी ३, न्यू सौजन्यनगर १, सिडको पाणी टाकीजवळ १, शाहनूरवाडी १, रांजणगाव २, नाईकनगर १, शाहूनगर १, एएस क्लबजवळ २, पडेगाव १, गजानननगर १, व्हिजन सिटी, कांचनवाडी १, निपाणी १, भारतमातानगर २, बेगमपुरा २, न्यू हनुमाननगर १, अजिंठा, सिल्लोड १, एन-१ सिडको १, शेंद्रा एमआयडीसी २, एन-१२ टीव्ही सेंटर १, जवाहर कॉलनी १, बजाजनगर ६, गंगापूर १, साऊथ सिटी १, एन-४ पारिजातनगर १, जाधववाडी २, आडगाव, कन्नड १, एन-८ सिडको ७, एन-२ सिडको २, टीव्ही सेंटर ५, राधास्वामी कॉलनी १, समृद्धी महामार्ग कर्मचारी १, नवजीवन कॉलनी १, पिसादेवी ४, हर्सूल सावंगी १, एन-७ सिडको १, शेंद्रा एमआयडीसी १, शेंद्रा २, सुंदरवाडी १, मयूरपार्क १, कुंभेफळ १, चिकलठाणा ३, टोणगाव १, उत्तरानगरी १, एन-६ सिडको २, कांचनवाडी ६, पैठण २, बीड बायपास ४, सातारा परिसर १,  नारेगाव १, विजयंतनगर २, पडेगाव १. 


१३ कोरोनाबाधितांचा मृत्यू
घाटीत गंगापूर उपजिल्हा रुग्णालयातील संदर्भित ५१ वर्षीय पुरुष, कन्नडमधील ७३, रांजणगाव शेणपुंजी येथील ६०, चिकलठाणा येथील ३०, वैजापूर तालुक्यातील टाकळी सागज येथील ४५, शहरातील हमालवाडातील ४९, गंगापूर तालुक्यातील बगडी येथील ५०, कन्नड तालुक्यातील अडगावातील ४४ वर्षीय पुरुष, लाडसावंगीतील ६० वर्षीय महिला, तर रिसोड, जि. वाशिम येथील ३० वर्षीय पुरुष, भोकरदन, जि. जालना येथील ५८ वर्षीय पुरुष, तर श्रीरामपूर, जि. नगर येथील ४८ वर्षीय महिलेचा कोरोनामुळे उपचारादरम्यान मृत्यू झाला, तर जिल्हा सामान्य रुग्णालयात कन्नड तालुक्यातील नागद येथील ६५ वर्षीय महिलेचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. 

Web Title: Aurangabad district has 27 thousand 712 corona patients; Total deaths 792

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.