बसपोर्ट, मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्या भूमिपूजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 27, 2019 07:36 PM2019-08-27T19:36:04+5:302019-08-27T19:37:40+5:30

साडेचार एकरावर उभारले जाणार नवीन मध्यवर्ती बसस्थानक

in Aurangabad, Busport, central bu stand Bhoomipoojan tomorrow | बसपोर्ट, मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्या भूमिपूजन

बसपोर्ट, मध्यवर्ती बसस्थानकाचे उद्या भूमिपूजन

googlenewsNext
ठळक मुद्देऔरंगाबादकरांची प्रतीक्षा संपणार 

औरंगाबाद : पर्यटन राजधानी असलेल्या औरंगाबादेतील सिडको बसस्थानकाच्या जागी उभारण्यात येणाऱ्या बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणीचे २८ आॅगस्ट रोजी भूमिपूजन होणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या आचारसंहितेपूर्वी या दोन्ही कामांचा नारळ फोडला जाणार आहे. 
शहरात दशकभरापासून अद्ययावत बसस्थानकाची प्रतीक्षा आहे. मध्यवर्ती बसस्थानक बांधून ५० वर्षांपेक्षा अधिक कालावधी उलटला आहे. सध्या बसस्थानकाची दुरवस्था झालेली आहे. त्यांची ही प्रतीक्षा लवकरच संपणार आहे. जवळपास ४.६ एक र जागेवर नवीन मध्यवर्ती बसस्थानक  उभारले जाणार आहे.

पूर्वी मध्यवर्ती बसस्थानकात बसपोर्ट उभारण्यात येणार होते. मात्र, खासगी भांडवलदार निविदा भरण्यास उत्सुक नसल्याचे समोर आले. त्यामुळे एसटी महामंडळाने सिडको बसस्थानकावर बसपोर्ट उभारण्याचा निर्णय घेतला. ‘डिझाईन-बिल्ड-फायनान्स-ट्रान्सफर-लीज’ तत्त्वावर आधुनिक बसपोर्टसह व्यापारी संकुल बांधून महामंडळास विनामूल्य हस्तांतर करण्यासाठी तिसऱ्यांदा निविदा मागविण्याची वेळ आली. त्यासंदर्भात मुंबई येथे प्रक्रिया करण्यात आली. एसटी महामंडळाचे विभाग नियंत्रक अरुण सिया म्हणाले, परिवहनमंत्री दिवाकर रावते यांच्या हस्ते बसपोर्ट आणि मध्यवर्ती बसस्थानकाचे २८ आॅगस्ट रोजी सायंकाळी भूमिपूजन करण्यात येणार आहे.

मध्यवर्ती बसस्थानक १८ महिन्यांत
प्रत्यक्ष बांधकामाला सुरुवात झाल्यानंतर १८ महिन्यांत मध्यवर्ती बसस्थानकाची उभारणी करण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. बसस्थानकाचा कंत्राटदार निश्चित झाला आहे. 

बसस्थानकात या सुविधा : नव्या मध्यवर्ती बसस्थानकात २८ प्लॅटफ ार्म राहणार आहेत. याठिकाणी तिक ीट आरक्षण क ार्यालय, वाहतूक  नियंत्रण क ार्यालय, पार्सल कक्ष, महिलांसाठी हिरक णी क क्ष, शिवशाही, शिवनेरी बसच्या प्रवाशांसाठी वातानुकू लित क क्ष असतील. जेनेरिक  मेडिक ल स्टोअर्स, खुले उपाहारगृह, चित्रपटगृह आदी सोयीसुविधाही उभारण्याचे नियोजन आहे.

बसपोर्ट २४ महिन्यांत
बसपोर्टचे काम सुरू झाल्यानंतर २४ महिन्यांत उभारणी करण्याची मुदत ठेवण्यात आली आहे. बसपोर्ट उभारणीसंदर्भातील सर्व प्रक्रिया मुंबई येथून करण्यात आली.

बसपोर्टमध्ये या सुविधा
विमानतळाच्या धर्तीवर बसपोर्ट उभारण्यात येणार आहे. याठिकाणी बस प्लॅटफॉर्म, फूड कोर्ट, व्यापारी संकुल, चित्रपटगृह, वातानुकूलित विश्रामगृह आदी सुविधा राहतील. ‘डोम’ ही बसपोर्टची अद्वितीय ओळख राहणार आहे. हे डोम म्हणजे प्रतीक्षालय.

Web Title: in Aurangabad, Busport, central bu stand Bhoomipoojan tomorrow

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.