कोरोनारूग्णांचा चढता आलेख सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2020 11:12 AM2020-09-24T11:12:43+5:302020-09-24T11:13:23+5:30

औरंगाबाद जिल्ह्यात बुधवार दि. २३ रोजी ३२९ कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले. तसेच उपचार सुरू असताना इतर जिल्ह्यातील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

The ascending graph of corona patients continues | कोरोनारूग्णांचा चढता आलेख सुरूच

कोरोनारूग्णांचा चढता आलेख सुरूच

googlenewsNext

औरंगाबाद: औरंगाबाद जिल्ह्यात बुधवार दि. २३ रोजी ३२९ कोरोना रूग्ण नव्याने आढळून आले. मागील काही दिवसांपासून दररोजच जिल्ह्यातील कोरोना रूग्णांची संख्या ३०० चा आकडा ओलांडत आहे. तसेच बुधवारी उपचार सुरू असताना इतर जिल्ह्यातील एक आणि औरंगाबाद जिल्ह्यातील ४ रुग्णांचा मृत्यू झाल्याची माहिती जिल्हा प्रशासनाने दिली.

कोरोना रूग्णांचा सततचा चढता आलेख प्रशासनाची आणि नागरिकांची चिंता वाढविणारा ठरत आहे. बुधवारी आढळून ३२९ रुग्णांमध्ये ग्रामीण भागातील १२६, मनपा हद्दीतील १००, सिटी एंट्री पॉइंटवरील १० आणि अन्य ९३ रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबधित रुग्णांची संख्या आता ३१,७७२ झाली आहे. यापैकी २४,६९२ रूग्ण बरे झाले असून जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ८९० रुग्णांचा मृत्यू झाला आहे. ६,१९० रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत.

 

Web Title: The ascending graph of corona patients continues

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.