क्रीडा महोत्सवात विद्यापीठाच्या अनिलची गोल्डन कामगिरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 11:04 PM2017-11-29T23:04:42+5:302017-11-29T23:05:11+5:30

दापोली येथे सुरूअसलेल्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे खेळाडू जबरदस्त कामगिरी करीत आहे. अनिल गुंघासे याने, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले आहे. त्याचप्रमाणे प्रमोद काळे आणि देवगिरी महाविद्यालयाच्या स्नेहल हार्दे यांनी विद्यापीठाला रौप्यपदक जिंकून दिले आहे.

Anilchi's golden performance at the Sports Festival | क्रीडा महोत्सवात विद्यापीठाच्या अनिलची गोल्डन कामगिरी

क्रीडा महोत्सवात विद्यापीठाच्या अनिलची गोल्डन कामगिरी

googlenewsNext
ठळक मुद्देप्रमोद काळे, स्नेहल हार्दे यांनीही जिंकली रौप्य

औरंगाबाद : दापोली येथे सुरूअसलेल्या राज्यस्तरीय अ‍ॅथलेटिक्स स्पर्धेत डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे खेळाडू जबरदस्त कामगिरी करीत आहे. अनिल गुंघासे याने, तर डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाला पहिले सुवर्णपदक जिंकून दिले आहे. त्याचप्रमाणे प्रमोद काळे आणि देवगिरी महाविद्यालयाच्या स्नेहल हार्दे यांनी विद्यापीठाला रौप्यपदक जिंकून दिले आहे.
अनिल गुंघासे याने ६४ मीटर १0 सेंटीमीटर भालाफेक करताना गोल्डन कामगिरी केली आहे. त्याचप्रमाणे प्रमोद काळे याने १३.५ मीटर अंतरावर गोळाफेक करताना रौप्यपदक जिंकले आहे. स्नेहल हार्दे या खेळाडूनेही जबरदस्त कामगिरी करताना उंच उडीत १.५0 मीटर उंच उडी घेताना रौप्यपदकाची कमाई केली आहे. या सर्व खेळाडूंना सुरेंद्र मोदी, अनिल निरावणे यांचे मार्गदर्शन लाभले आहे. दरम्यान, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या मुलींच्या आणि मुलांच्या अशा दोन्ही संघांनी उपांत्य फेरीत धडक मारताना पदकांच्या आशा जिवंत ठेवल्या आहेत. पदकविजेते अनिल गुंघासे, प्रमोद काळे आणि स्नेहल हार्दे यांचे विद्यापीठाच्या क्रीडा विभागाचे संचालक डॉ. दयानंद कांबळे यांनी अभिनंदन केले आहे.

Web Title: Anilchi's golden performance at the Sports Festival

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.