‘व्हाट्स ॲप ग्रुप’च्या माध्यमातून विधायक कामेही करा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 11, 2021 04:05 AM2021-05-11T04:05:52+5:302021-05-11T04:05:52+5:30

औरंगाबाद : केवळ समाजव्यवस्थेची उणीदुणी काढण्यासाठी, टिंगल टवाळी करण्यासाठी किंवा तत्त्वज्ञान पाजळण्यासाठी ‘व्हाट्स ॲप ग्रुप’ असतो, ही संकल्पना शहरातील ...

Also do constructive work through ‘WhatsApp Group’ | ‘व्हाट्स ॲप ग्रुप’च्या माध्यमातून विधायक कामेही करा

‘व्हाट्स ॲप ग्रुप’च्या माध्यमातून विधायक कामेही करा

googlenewsNext

औरंगाबाद : केवळ समाजव्यवस्थेची उणीदुणी काढण्यासाठी, टिंगल टवाळी करण्यासाठी किंवा तत्त्वज्ञान पाजळण्यासाठी ‘व्हाट्स ॲप ग्रुप’ असतो, ही संकल्पना शहरातील काही तरुणांनी मोडित काढत विधायक कामासाठी या ग्रुपचा वापर सुरू केला आहे. ग्रुप ॲडमिन व काही सदस्यांनी स्वत:चे पैसे जमा करून कोरोनाच्या या दुसऱ्या लाटेत गरीब व गरजू लोकांना अन्नधान्य वाटपाचा अभिनव उपक्रम हाती घेतला आहे. मिलकॉर्नर येथील जयेश मोरे, विनोद नरवडे, कैलास काकडे, संजय वाघमारे, नासेर भाई, संजीव वीर हे एका व्हाट्स ॲप ग्रुपचे ॲडमिन आहेत. त्यांनी निर्धार केला की, सध्या ‘ब्रेक दि चेन’मध्ये रिक्षाचालक, हातगाडीवाले, मोलमजुरी करणाऱ्या कामगारांच्या हाताला काम नाही. समाजातील अनेक गरीब व कष्टकरी नागरिकांची उपासमार सुरू आहे. त्यामुळे त्यांना अन्नधान्य पुरवठा करायचा. यासाठी ॲडमिन व ग्रुपमधील काही सदस्यांनी स्वत:चे पैसे जमा केले व त्यातून ८ क्विंटल गहू खरेदी केला. प्रत्येक नागरिकाला आता ते १० किलो गहू वाटप करीत आहेत.

विशेष म्हणजे, मोफत गहू वाटपाच्या या मोहिमेत लोकांची गर्दी होईल म्हणून त्यांनी कूपन तयार केले असून, ग्रुपमधील सदस्यांमार्फत गरजू लोकांना ते वाटप केले आहे. कूपन घेऊन मिलकॉर्नर येथे गेलेल्या व्यक्तीस मोफत गहू दिला जात आहे. यामुळे कोरोनाच्या या काळात शारीरिक अंतरही राखण्याचा नियम पाळला जातो, असे जयेश मोरे यांनी सांगितले.

Web Title: Also do constructive work through ‘WhatsApp Group’

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.