जरंडीपाठोपाठ निंबायती केंद्रही भरण्याच्या मार्गावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 13, 2021 04:05 AM2021-04-13T04:05:41+5:302021-04-13T04:05:41+5:30

सोयगाव : तालुक्यात सोमवारी दिवसभरात जरंडी आणि निंबायती कोविड केंद्रात तब्बल २७ नवे कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. ...

Along with Jarandi, Nimbayati Kendra is also on the way to be filled | जरंडीपाठोपाठ निंबायती केंद्रही भरण्याच्या मार्गावर

जरंडीपाठोपाठ निंबायती केंद्रही भरण्याच्या मार्गावर

googlenewsNext

सोयगाव : तालुक्यात सोमवारी दिवसभरात जरंडी आणि निंबायती कोविड केंद्रात तब्बल २७ नवे कोरोनाबाधित रुग्ण उपचारासाठी दाखल झाले आहेत. त्यामुळे आठवड्याभरापासून फुल झालेल्या जरंडी कोविड केंद्रापाठोपाठ आता निंबायती केंद्रही फुल होण्याच्या मार्गावर आले आहे. त्यामुळे तालुका प्रशासनासमोर चिंता वाढली आहे. एकूण बाधितांची संख्या २३४ वर पोहोचली आहे. तर १५४ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. सध्या ७२ रुग्णांवर उपचार सुरू आहेत.

तालुक्यातील रुग्णसंख्येचा आलेख वाढतच असून, दुसरीकडे आरोग्य यंत्रणेवरील ताण वाढला आहे. निंबायती कोविड केंद्रात आरोग्य कर्मचाऱ्यांची कमतरता आहे. तालुका आरोग्य अधिकारी डॉ. श्रीनिवास सोनवणे हे स्वत: रुग्णांंवर उपचार करीत आहेत.

निंबायतीला एकच आरोग्य सेवक

महिन्याभरापूर्वी निंबायती कोविड केंद्राला कर्मचारी नसल्याने जरंडीच्या केंद्रातील एका आरोग्य सेवकाला निंबायती कोविड केंद्रावर पदोन्नती देऊन पाठविण्यात आले. त्यानंतर येथे एकही वैद्यकीय अधिकारी पाठ‌विण्यात आला नाही. तर जरंडी येथील कोविड सेंटरवर डॉ. नितीन चव्हाण, डॉ. आबेद शेख, डॉ. बाजीराव मांडावी, प्रिया राऊत, सुप्रिया मेश्राम, वर्षा शेळके, अतुल नवले हे काम करतात. त्यांनाच निंबायती केंद्रावर उपचार देण्यासाठी जावे लागते.

Web Title: Along with Jarandi, Nimbayati Kendra is also on the way to be filled

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.