विदेशातील १०७ विद्यार्थ्यांचा विविध विभागांत प्रवेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 10, 2021 04:05 AM2021-04-10T04:05:16+5:302021-04-10T04:05:16+5:30

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या ‘एक खिडकी योजना’ व ‘ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया’ या ...

Admission of 107 students from abroad in various departments | विदेशातील १०७ विद्यार्थ्यांचा विविध विभागांत प्रवेश

विदेशातील १०७ विद्यार्थ्यांचा विविध विभागांत प्रवेश

googlenewsNext

औरंगाबाद : डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठात विदेशी विद्यार्थ्यांसाठी राबविण्यात आलेल्या ‘एक खिडकी योजना’ व ‘ऑनलाइन प्रवेश प्रक्रिया’ या उपक्रमामुळे यंदा ११ देशांतील १०७ विद्यार्थ्यांनी विद्यापीठातील विविध विभागांत अध्यापन, संशोधनासाठी प्रवेश घेतला आहे.

पूर्वी औरंगाबादेत शिक्षण घेण्यासाठी मध्यपूर्व आशिया देशातील विदेशी विद्यार्थ्यांचा मोठा ओढा होता. तथापि, मध्यतंरीच्या काळात विदेशी विद्यार्थ्यांच्या संख्येत मोठी घट झाली. यासंदर्भात कुलगुरू डॉ. प्रमोद येवले यांनी विदेशी विद्यार्थ्यांसाठी ‘एक खिडकी योजना’ तसेच ‘प्रवेश ते निकाल’ ही संपूर्ण प्रक्रिया ऑनलाइन राबविण्याचा निर्णय घेतला. ‘विदेशी विद्यार्थी कक्ष’च्या माध्यमातून प्रवेश प्रक्रिया मोहीम राबविण्यात आली. २०२०-२०२१ या शैक्षणिक वर्षात एकूण ११ देशांतील १०७ विद्यार्थ्यांनी विविध विभागांत, तसेच संशोधनासाठी प्रवेश घेतला. यातील ४४ जण पीएच.डी.साठी, तर ६३ विद्यार्थ्यांनी विविध पदव्युत्तर अभ्यासक्रमांना प्रवेश घेतला. यामध्ये सर्वाधिक ८९ जण हे येमेनचे असून, अफगाणिस्तान, कांगो, इराक, सिरिया, जॉर्डन, नेपाळ व पॅलेस्टाइन या देशांतील प्रत्येकी १ विद्यार्थ्याने प्रवेश घेतला, तर सोमालिया- ७ व सुदान आणि थायलंड येथील प्रत्येकी २ विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला आहे, अशी माहिती विदेशी विद्यार्थी कक्षाचे संचालक डॉ. मुस्तजीब खान यांनी दिली.

Web Title: Admission of 107 students from abroad in various departments

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.