घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज पळवणारा आरोपी २४ तासाच्या आत अटकेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 3, 2020 07:34 PM2020-07-03T19:34:57+5:302020-07-03T19:35:41+5:30

चोरट्याला २४ तासांच्या आत जिंसि पोलिसांनी अटक केली .

Accused of burglary of cable operator's house arrested within 24 hours | घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज पळवणारा आरोपी २४ तासाच्या आत अटकेत

घरफोडी करून दीड लाखांचा ऐवज पळवणारा आरोपी २४ तासाच्या आत अटकेत

googlenewsNext

औरंगाबाद :  सासऱ्याची तब्येत बरी नसल्यामुळे सासूरवाडीला गेलेल्या केबल ऑपरेटरचे बंद घर फोडुन सुमारे दिड लाखाची सोन्याचांदीची दागिने आणि रोख रक्कम चोरून नेणाऱ्या चोरट्याला २४ तासांच्या आत जिंसि पोलिसांनीअटक केली . 

सय्यद हनीफ ऊर्फ बा सय्यद हबीब (२२ , रा . शरीफ कॉलनी ) असे अटकेतील चोराचे नाव आहे . पोलिसांनी सांगितले की किराडपुरा येथील अहेमद खान साहेब खान यांच्या सासरे आजारी असल्यामुळे अहेमद हे घराला कुलूप लावून सहपरिवार शरीफ कॉलनीत १० ते १२ दिवसापासून सासूरवाडीत गेले होते . २  जून रोजी पहाटे ३ वाजता नळाचे पाणी भरण्यासाठी ते घरी परतले असता चोरट्यानी घर फोडल्याचे त्यांना दिसले लोखंडी कपाटाचे लॉकर उघडून त्यातील सोन्याची रिंग , अंगठी , एकदाणी, सोन्याची पट्टी , सोन्याचे मणी , चांदीचे जोडवे आणि रोख ३० हजार असा सुमारे दिड लाखाचा ऐवज चोरट्यानी पळविल्याचे दिसले . 

याविषयी त्यांनी जिंसी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदविली . पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे ,  सहाय्यक पोलीस निरीक्षक शरद जोगदंड ,पोलीस उपनिरीक्षक दत्ता शेळके ,  रफी शेख ,संपत राठोड, हारुण शेख , संजय गावंडे , गणेश नागरे आणि प्रवीण टकले यांच्या पथकाने तपास करून संशयित आरोपी सय्यद हनिफ याला पकडले . सुरवातीला तो उडवाउडवीची उत्तरे पोलिसांना देऊ लागला . पोलिसांनी खाक्या दाखविताच गुंह्याची कबुली त्याने दिली . शरीफ कॉलनीत सासूरवाडीत राहत असलेल्या कुटुंबाचे घर त्याला माहित होते . यामुळे संधी साधून ही घरफोडी केल्याचे तो म्हणाला . चोरलेला माल त्याने पोलिसांच्या हवाली केला .

Web Title: Accused of burglary of cable operator's house arrested within 24 hours

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.