जायकवाडी धरणाची ८ दरवाजे उघडले; गोदावरी पात्रात ५७८१ क्युसेकने विसर्ग 

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 16, 2019 06:56 PM2019-08-16T18:56:53+5:302019-08-16T19:34:06+5:30

दरवाजा क्र.10,14,16,18,19,21,23,27  हे आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून विसर्ग सुरु

8 gates of Jayakwadi dam opened; 5781 cusec water released in Godawari river | जायकवाडी धरणाची ८ दरवाजे उघडले; गोदावरी पात्रात ५७८१ क्युसेकने विसर्ग 

जायकवाडी धरणाची ८ दरवाजे उघडले; गोदावरी पात्रात ५७८१ क्युसेकने विसर्ग 

googlenewsNext
ठळक मुद्देनाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारे विसर्ग चार दिवसापासून बंदधरणाचा जलसाठा ९१.९९ % झाल्याने धरणातून विसर्ग

पैठण (औरंगाबाद ): जायकवाडी धरणाचे आठ दरवाजे अर्धाफुटाने वर उचलून गोदावरी पात्रात सांडव्यातून ४१९२ क्युसेक क्षमतेने विसर्ग करण्यात येत आहे. जायकवाडी धरणाच्या जलविद्युत प्रकल्पाच्या विमोचिकेतून गोदावरी पात्रात १५९० विसर्ग सुरू असल्याने धरणातून गोदावरी पात्रात एकत्रित ५७८१ क्युसेक असा विसर्ग सुरू आहे. धरणातून गोदावरी पात्रात विसर्ग होत असल्याने गोदावरी गतीने वहाती झाली आहे. गोदावरीतून वाहते झालेले पाणी आज जालना जिल्ह्यात पोहचले असल्याचे जायकवाडीचे कार्यकारी अभियंता अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

जायकवाडी धरणाचा जलसाठा १५ ऑगस्ट रोजी ९२% च्या जवळपास पोहचल्याने जायकवाडी धरणाच्या सांडव्यातून गोदावरी पात्रात पाणी सोडण्याचा निर्णय घेऊन जायकवाडी प्रशासनाने १५ ऑगस्ट रोजी दुपारी १ वाजता धरणाचे दोन दरवाजे अर्धा फुटाने उचलून गोदावरीत पहिला विसर्ग केला.
या वेळी गोदावरी पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी संचालक ए पी कोहिरकर, मुख्य अभियंता दिलीप तवार, यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे, उपविभागीय अभियंया अशोक चव्हाण, बुध्दभूषण दाभाडे, संदीप राठोड, आर ई चक्रे, राजाराम गायकवाड, बबन बोधने, खराडकर आदींनी पाणी सोडण्याची प्रक्रिया पूर्ण केली.

जायकवाडी धरणातून होणारा विसर्ग
जायकवाडी धरणाचे दरवाजा क्र.10,14,16,18,19,21,23,27  हे आठ दरवाजे अर्धा फुटाने वर उचलून प्रत्येक दरवाजातून ५२४ क्युसेक असा मिळून ४१९२ क्युसेक व जलविद्युत प्रकल्पातून विद्युत निर्मिती नंतर विमोचिकेतून १५८९ क्युसेक असा मिळून गोदावरी पात्रात ५७८१ क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाच्या डाव्या कालव्यातून १४०० क्युसेक व उजव्या कालव्यातून ९०० क्युसेक विसर्ग सुरू आहे. धरणाच्या जलसाठ्यातून ८०८० क्युसेक एकूण विसर्ग सर्व मार्गाने होत आहे. धरणातून सोडण्यात आलेल्या पाण्यामुळे गोदावरी नदी पात्रातील औरंगाबाद, जालना, बीड आणि परभणी जिल्ह्यातील बंधारे भरणार आहेत. शिवाय नदीकाठावरील गावांची तहान भागणार असून लाभक्षेत्रातील विहीरींची पाणीपातळी वाढणार आहे. गोदावरी नदी पात्रातील औरंगाबाद आणि जालना जिल्ह्यातले सर्व बंधाऱ्याचे दरवाजे उघडे करून खालील बंधाऱ्यासाठी मार्ग मोकळा करून देण्यात आला आहे.

आवक बंद
नाशिक व अहमदनगर जिल्ह्यातील धरण समूहातून होणारे विसर्ग चार दिवसापासून बंद करण्यात आल्याने गुरुवारी धरणात येणारी आवक निरंक झाली. मात्र धरणाचा जलसाठा ९१.९९ % झाल्याने धरणातून विसर्ग करण्यात येऊन धरणात आगामी काळातील संभाव्य पूर नियंत्रित करण्यासाठी पॉकेट तयार करण्यात येत आहे. मराठवाड्यात पाणी टंचाई असल्याने तेथील पाणीटंचाईचे निवारण होणार असल्याचे कार्यकारी अभियंता राजेंद्र काळे यांनी सांगितले.

Web Title: 8 gates of Jayakwadi dam opened; 5781 cusec water released in Godawari river

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.