नवे रूग्ण २१४ तर ३९० रुग्णांना सुटी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 28, 2020 11:54 AM2020-09-28T11:54:26+5:302020-09-28T11:54:58+5:30

औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक राहीली. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे.

214 new patients and 390 patients discharged | नवे रूग्ण २१४ तर ३९० रुग्णांना सुटी

नवे रूग्ण २१४ तर ३९० रुग्णांना सुटी

googlenewsNext

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात रविवारी पुन्हा एकदा पॉझिटिव्ह रुग्णांपेक्षा कोरोनामुक्त रुग्णांची संख्या अधिक राहीली. त्यामुळे नागरिकांसह प्रशासनाला दिलासा मिळाला आहे. रविवारी तब्बल ३९० रूग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले तर २१४ रूग्ण नव्याने सापडले.

औरंगाबाद जिल्ह्यातील ८ रुग्णांचा मृत्यू झाला. जिल्ह्यातील एकूण रुग्णांपैकी आतापर्यंत २६,११६ रूग्ण बरे झाले आहेत. जिल्ह्यात आढळून आलेल्या नव्या २१४ रुग्णांत ग्रामीण भागातील १०३, मनपा हद्दीतील ७१ आणि अन्य ४० रुग्णांचा समावेश आहे. जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या आता ३२,९९३ झाली आहे. तर जिल्ह्यात आतापर्यंत एकूण ९१७ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या एकूण ५, ९६० रुग्णांवर उपचार सुरू आहेत.  

उपचार सुरू असताना धनगाव पैठण येथील ४२ वर्षीय पुरुष, बाळहरीनगर, वैजापुरातील ६५ वर्षीय स्त्री, पडेगावातील ४६ वर्षीय पुरूष, करमाड येथील ७५ वर्षीय स्त्री, एन सात सिडकोतील ६१ वर्षीय पुरूष, शिवाजीनगरातील ७१ वर्षीय पुरूष, सिल्लोड तालुक्यातील गोळेगावातील ६२ वर्षीय पुरूष, रांजणगाव, वाळूजमधील ७० वर्षीय पुरूष आणि साखरवाडी- कोपरगाव,अहमदनगर येथील ५० वर्षीय महिलेचा मृत्यू झाला.

Web Title: 214 new patients and 390 patients discharged

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.