भारताचा धावपटू मोहम्मद अनासचा विक्रम

By ऑनलाइन लोकमत | Published: July 22, 2018 06:52 PM2018-07-22T18:52:08+5:302018-07-22T18:52:58+5:30

भारताचा धावपटू मोहम्मद अनासने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे.

India's runner Mohammed Anas made record | भारताचा धावपटू मोहम्मद अनासचा विक्रम

भारताचा धावपटू मोहम्मद अनासचा विक्रम

Next
ठळक मुद्देया विक्रमाबद्दल भारतीय अॅथलेटीक्स महासंघाने अनासचे कौतुक केले आहे.

नवी दिल्ली : भारताचा धावपटू मोहम्मद अनासने नव्या विक्रमाला गवसणी घातली आहे. झेक प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या अॅथलेटीक्स स्पर्धेमध्ये अनासने हा विक्रम केला आहे. या स्पर्धेच्या 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत त्याने आपलाच राष्ट्रीय विक्रम मोडीत काढला आहे. या स्पर्धेत अनासने 400 मी. हे अंतर 45.24 सेकंदामध्ये पूर्ण केले आहे. या विक्रमाबद्दल भारतीय अॅथलेटीक्स महासंघाने अनासचे कौतुक केले आहे.



 
अनासने यापूर्वी 400 मी. धावण्याच्या स्पर्धेत राष्ट्रीय विक्रम नोंदवला होता. यापूर्वी अनासने हे अंतर 45.31 सेकंदांमध्ये पूर्ण केले होते. त्यानंतर सध्या झेल प्रजासत्ताक येथे सुरु असलेल्या स्पर्धेत अनासने जुना विक्रम मोडीत काढला.

Web Title: India's runner Mohammed Anas made record

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.