आजचे राशीभविष्य- १४ ऑक्टोबर २०२५: आर्थिक लाभ होतील

जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस... काय सांगते तुमची राशी...

आपल्या राशी पासून चंद्र तिसरा भावात असणार आहे. आजची सकाळची वेळ नवीन कार्यारंभासाठी अनुकूल आहे. सरकारी लाभ होतील. व्यापार - व्यवसायात लाभ होतील. नोकरीत वरिष्ठ खुश होतील.

आपल्या राशी पासून चंद्र दुसरा भावात असणार आहे. आजचा दिवस आपणाला मध्यम फलदायी आहे. मित्र व स्नेहीजनांच्या सहवासाने आपण आनंदित व्हाल.

आपल्या राशी पासून चंद्र प्रथम भावात असणार आहे. आजचा दिवस आर्थिक लाभाचा आहे. आज आप्तेष्टांचा सहवास आनंददायी ठरेल. सुंदर वस्त्रे आणि उत्तम भोजनाचा लाभ होईल.

आजचा दिवस प्राप्तीच्या प्रमाणात अधिक खर्च करण्याचा आहे. नेत्र विकार बळावतील. मानसिक चिंता वाढतील. कोणाशी वाद होऊ नयेत म्हणून आपल्या कृतींवर संयम ठेवा. 

आजची सकाळची वेळ फारच चांगली आहे. सामाजिक व व्यावसायिक क्षेत्रांत आनंददायक व लाभदायक बातम्या प्राप्त होतील. मित्रांकडून एखादी चांगली बातमी मिळू शकेल. धनलाभ होऊन प्राप्तीत वाढ होईल.

आजचा दिवस अनुकूलतेचा आहे. कुटुंबियांशी सलोखा राहील. आप्तेष्टांकडून भेटवस्तू मिळू शकतील. नोकरीत वरिष्ठ आपल्या कामावर खुश होतील. त्यामुळे आपण आनंददित व्हाल. 

आज सकाळी आपले मन चिंतातुर होईल. शारीरिक दृष्टया शैथिल्य व आळस वाढेल. नोकरीत वरिष्ठ नाराज होतील. संततीशी मतभेद संभवतात.

हातून एखादे अवैध कार्य होण्याची शक्यता आहे. मानहानी संभवते. आपले बोलणे संयमित ठेवल्यास परिस्थिती आपणास अनुकूल होऊ शकेल. 

आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. सकाळी मनोरंजनात्मक कार्यात सहभागी व्हाल. कुटुंबात आनंदी वातावरण राहील. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य चांगले राहील.

आज आपणास आपली वाणी संयमित ठेवावी लागेल. घरातील वातावरण आनंददायी राहील. सामाजिक मान- सन्मान संभवतात. आर्थिक लाभ होतील. 

आज आपल्यात कले विषयी विशेष गोडी निर्माण होईल. खर्चाचे प्रमाण वाढेल. संतती विषयक प्रश्न भेडसावतील. दुपार नंतर घरातील वातावरण शांतिपूर्ण राहील.

आज आपण अती भावनाशील व्हाल. अती विचारांमुळे मानसिक थकवा जाणवेल. सबब जमीन, घर, संपत्ती इ. विषयी चर्चा टाळणे हितावह राहील. 

Click Here