आजचे राशीभविष्य, ९ डिसेंबर: आज महत्वाचे निर्णय घेऊ नका

कोणत्या राशींच्या लोकांसाठी आजचा दिवस फलदायी, कुणासाठी वाईट?

आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे व जलाशयापासून दूर राहावे.

कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष देऊ शकाल

आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. नोकरी-व्यवसायात कार्यकर्ते, सहकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल.

मित्र व स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात जाईल. मन अगदी संयमी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. प्रवासाची व आर्थिक लाभाची शक्यता आहे.

उग्र स्वभावाने किंवा वाद-विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावध पाऊले टाका. भावनेच्या भरात काही अविचारी काम हातून घडणार नाही याकडे लक्ष द्या.

व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ खूष झाल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक होतील.

मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापार्‍यांच्या व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल.

आज आळस, थकवा व चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. प्रतिस्पर्धी व विरोधक यांची ताकद वाढेल. व्यवसायात संकटे येतील. आज महत्वाचे निर्णय घेऊ नका.

आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे.आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. एखादा आजार सतावेल. खर्चात वाढ होईल.

भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. व्यापारी आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतील. आर्थिक लाभ व मान - सन्मान ह्यात वृद्धी होईल.

आज आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. नोकरी - व्यवसायात सहकारी सहकार्य करतील.

साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. मनात एखादी अनामिक भीती निर्माण होईल. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आजचा दिवस प्रणयाराधनेसाठी अनुकूल आहे.

चाळीशीनंतरही चष्मा लागणार नाही, फक्त या ४ गोष्टी खायला सुरुवात करा !

Click Here