आजचे राशीभविष्य, ०३ मे २०२६

आजचा दिवस तुमच्यासाठी कसा असेल? कोणत्या राशींना लाभ होईल आणि कोणाला सावधान राहावे लागेल? जाणून घ्या सर्व १२ राशींचे भविष्य!

मेष- आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा ठरेल. गूढ व रहस्यमय विद्येची गोडी वाटेल. एखाद्या विषयात प्राविण्य मिळण्याची शक्यता आहे. 

वृषभ- आज दांपत्य जीवनात विशेष आनंद मिळेल. आपण सहकुटुंब एखाद्या सामाजिक ठिकाणी फिरायला किंवा छोटा प्रवास करायला जाऊन दिवस आनंदात घालवाल. 

मिथुन- आजचा दिवस शुभ फलदायी आहे. घरात शांती व आनंदाचे वातावरण राहील. अपूर्ण कामे तडीस गेल्याने आपणांस यश व कीर्ती लाभेल. आर्थिक लाभ होतील. खर्चाचे प्रमाण मात्र वाढेल. 

कर्क- आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. नवीन कार्यारंभासाठी आजचा दिवस प्रतिकूल आहे. मानसिक अशांतता व उद्वेगाने मन भरून जाईल.

सिंह- आजचा दिवस सावध राहण्याचा आहे. उक्ती व कृती ह्यावर संयम ठेवल्यास संभाव्य वाद टाळू शकाल. आईशी मतभेद होण्याची शक्यता आहे.

कन्या- आजचा दिवस शारीरिक उत्साह व मानसिक प्रसन्नता ह्यामुळे मनाला शांतता मिळवून देणारा आहे. कार्यात यश मिळेल.

तूळ- आज आपले मनोबल कमी राहिल्यामुळे कोणत्याही निर्णयाप्रत येणे अवघड होईल. नवीन काम किंवा एखादा महत्त्वाचा निर्णय आज टाळणे हितावह राहील.

वृश्चिक- आज शारीरिक व मानसिक प्रसन्नता लाभेल. घरात सुखा - समाधानाचे वातावरण राहील. 

धनु- आजचा दिवस कष्टदायी आहे. कुटुंबियांशी मतभेद होतील. स्वभावात क्रोध व आवेश राहिल्याने कोणाशी तीव्र स्वरुपाचे भांडण होईल. आरोग्य बिघडेल. बोलणे व वागणे यांवर संयम ठेवावा लागेल. 

मकर- आजचा दिवस लाभदायी आहे. सगे - सोयरे व मित्रांशी होणारी भेट आनंददायक ठरेल. विवाहेच्छुकांना अपेक्षित जोडीदार मिळेल. व्यापारात सुद्धा दिवस लाभदायी ठरेल. 

कुंभ- आज शारीरिक व मानसिक स्थिती चांगली राहील. व्यवसायात आपल्या कामाचे कौतुक होईल. त्यामुळे आनंद होईल. कामाच्या ठिकाणी सहकार्यांचे चांगले सहकार्य मिळेल. 

मीन- आज वरिष्ठांशी मतभेद होतील. शारीरिक कंटाळा व मानसिक चिंता राहील. शक्यतो प्रतिस्पर्ध्यांशी वादविवाद टाळा.