आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
By ऑनलाइन लोकमत | Updated: July 20, 2025 07:29 IST2025-07-20T07:28:38+5:302025-07-20T07:29:28+5:30
Todays Horoscope: कोणत्या राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास आणि कोणत्या राशींना समस्यांचा सामना करावा लागणार? वाचा आजचे राशीभविष्य!

आजचे राशीभविष्य, २० जुलै २०२५: संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा
मेष:आज चंद्र 20 जुलै, 2025 रविवारी मेष राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाचा प्रारंभ स्फूर्ती व उत्साहाने होईल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. दुपार नंतर मात्र आरोग्याच्या तक्रारी उदभवू शकतात. कौटुंबिक वातावरण आनंददायी राहील. मित्र व आप्तेष्टांची भेट होईल. दुपार नंतर कुटुंबियांशी कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. आहारावर नियंत्रण ठेवावे लागेल. इतरांशी बोलताना वाणी संयमित ठेवावी. आणखी वाचा
वृषभ: आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. द्विधा मनःस्थितीमुळे आपण असमाधानी राहाल. सर्दी, कफ, खोकला, ताप ह्यांचा उपद्रव संभवतो. धार्मिक कार्यसाठी खर्च होईल. स्वकीयांशी दुरावा संभवतो. दुपार नंतर परिस्थिती अनुकूल होईल. कामाचा उत्साह येईल. आर्थिक लाभ होतील. आप्तेष्टांचा सहवास घडेल. शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील. आणखी वाचा
मिथुन: व्यक्तिगत व व्यावसायिक क्षेत्रात आजचा दिवस फार चांगला जाईल. दोन्ही ठिकाणी महत्त्वाच्या विषयांवर चर्चेत सहभागी होऊ शकाल. कामाचा व्याप वाढून त्याचा आपल्या आरोग्यावर प्रतिकूल परिणाम होण्याची शक्यता आहे. मात्र, दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. मित्रांच्या भेटीने आनंद होईल. आणखी वाचा
कर्क: आज कौटुंबिक व व्यावसायिक जीवन आनंदी राहील. ह्या दोन्ही ठिकाणी महत्वाच्या चर्चेत आपण सहभागी व्हाल. कामाचा व्याप वाढल्याने प्रकृतीवर प्रतिकूल परिणाम होईल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होऊ लागेल. मित्र भेटीने आपण आनंदित व्हाल. त्यांच्यासह एखाद्या सहलीचे नियोजन करू शकाल. आणखी वाचा
सिंह: आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. दिवसाची सुरवात शारीरिक व मानसिक अस्वस्थतेने होईल. अती संतापाने इतरांची मने दुखवाल. दुपार नंतर प्रकृतीत सुधारणा होईल. कौटुंबिक वातावरण आनंदी राहील. आणखी वाचा
कन्या:आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. इतरांशी वाद होऊ नयेत म्हणून आपली वाणी संयमित ठेवावी. प्रकृती नरम गरमच राहील. दुपारनंतर एखाद्या प्रवासाचे नियोजन करू शकाल. एखाद्या मंगल कार्यात सहभागी होऊ शकाल. आणखी वाचा
तूळ: आजच्या दिवसाची सुरुवात आनंददायी असेल. जहाल विचार आणि अधिकाराची भावना मनात राहील. एखाद्या प्रवासामुळे काही आर्थिक लाभ संभवतो. मात्र, दुपार नंतर एखादा अनर्थ टाळण्यासाठी आपणास आपल्या वक्तव्यावर संयम ठेवावा लागेल. हितशत्रूंचा त्रास संभवतो. आणखी वाचा
वृश्चिक: आजचा दिवस बौद्धिक कार्य, जनसंपर्क व इतरांत मिळून- मिसळून राहण्याच्या दृष्टीने चांगला आहे. जवळचा प्रवास संभवतो. आर्थिक नियोजन यशस्वीपणे करू शकाल. दुपार नंतर मित्र व कुटुंबियांसह प्रवासाचे आयोजन करू शकाल. स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घेऊ शकाल. वैचारिक पातळीवर अती उत्साहास आवर घालावा लागेल. आणखी वाचा
धनु: आज शारीरिक व मानसिक आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. कठोर परिश्रमानंतर कामात यश मिळेल तरी निराश होऊ नका. प्रवासात अडचणी येतील. दुपार नंतर परिस्थितीत आपणास अनुकूल असा बदल घडून येईल. शरीरात उत्साह संचारेल. आर्थिक लाभ संभवतात. व्यावसायिक नियोजन योग्य प्रकारे कराल. आणखी वाचा
मकर: आज आपण फारच भावनाशील व्हाल. आपल्या भावना दुखावल्या जातील. वाहन चालवताना दक्ष राहा. संकटात टाकणारे विचार, व्यवहार व नियोजनापासून दूर राहा. कोणत्याही गोष्टीत घाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबीयांशी मतभेद वाढणार नाहीत ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा
कुंभ: आजचा दिवस महत्त्वाचा निर्णय घेण्यास अनुकूल नाही. मात्र, नवीन कार्यारंभासाठी आज दिवसाच्या सुरुवातीचा वेळ खूप अनुकूल आहे. दुपार नंतर मानसिक व्यग्रता वाढेल. संपत्ती विषयक दस्तावेज करण्यास आजचा दिवस अनुकूल नाही. विद्यार्थ्यांसाठी आजचा दिवस मध्यम फलदायी आहे.मातेच्या प्रकृतीची काळजी घ्यावी लागेल. आणखी वाचा
मीन: आज पैसे जास्त खर्च होतील त्यामुळे मन बेचैन होईल. मतभेद व तणाव निर्माण होऊ नयेत म्हणून आपल्या वाणीवर नियंत्रण ठेवा. आर्थिक बाबीत सावध राहा. व्यवसायात स्पर्धेला तोंड द्यावे लागेल. विचार सारखे बदलत राहतील, त्यामुळे मनःस्थिती द्विधा होईल. निर्णय क्षमतेचा अभाव राहील. आणखी वाचा