आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 9, 2025 07:28 IST2025-12-09T07:28:04+5:302025-12-09T07:28:29+5:30
Horoscope Today: आजचा दिवस तुमच्यासाठी कसा राहील? वाचा संपूर्ण राशीभविष्य

आजचे राशीभविष्य, ०९ डिसेंबर २०२५:आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल
मेष- आज चंद्र 09 डिसेंबर, 2025 मंगळवार च्या दिवशी कर्क राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आजचा दिवस मानसिक व्यग्रतेत जाईल. जास्त भावनावश होऊ नका. त्यामुळे बोलण्यावर संयम न राहून त्रास होऊ शकतो. आईच्या स्वास्थ्याची काळजी घ्यावी लागेल. शक्यतो स्थावर संपत्तीची चर्चा टाळावी. अपघाताच्या शक्यतेमुळे वाहन जपून चालवावे व जलाशया पासून दूर राहावे. आणखी वाचा
वृषभ- आज शरीराने व मनाने मोकळे वाटेल. उत्साह वाढेल. मन संवेदनशील बनेल. कल्पनाशक्ती वाढल्यामुळे काल्पनिक जगाची सफर आपण कराल. कौटुंबिक विषयात रस घ्याल व प्रवासाचे बेत आखाल. आर्थिक व्यवहारांकडे अधिक लक्ष देऊ शकाल. आणखी वाचा
मिथुन- आज आपणास कामात सफलता मिळेल, फक्त थोडा उशीर लागेल. तरीही प्रयत्न सुरू ठेवून ती पूर्ण करू शकाल. आर्थिक कामात अडथळे दूर होऊन मार्ग मोकळा सापडेल. नोकरी - व्यवसायात बरोबरचे कार्यकर्ते किंवा सहकारी यांचे पूर्ण सहकार्य मिळेल. आणखी वाचा
कर्क- आज आपणास शारीरिक व मानसिक सौख्य मिळेल. मित्र व स्वजन यांच्यासह आजचा दिवस खूप आनंदात व उल्हासात जाईल. आपले मन अगदी संयमी राहील. वैवाहिक जीवनाचा मनसोक्त आनंद उपभोगू शकाल. आणखी वाचा
सिंह- आज मनास चिंता लागून राहिल्याने स्वास्थ्य बिघडेल. उग्र स्वभावाने किंवा वाद - विवादामुळे कोणाबरोबर संघर्ष होईल. कोर्ट - कचेरीच्या कामात सावधपणे पाऊले टाका. भावनेच्या प्रवाहात वाहत जाऊन काही अविचारी काम हातून घडणार नाही याकडे लक्ष द्या. आणखी वाचा
कन्या- आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आजचा दिवस तन मनाच्या स्वस्थते बरोबर आपणास विविध लाभ मिळवून देईल. व्यापारात व नोकरीत आर्थिक लाभ होईल. वरिष्ठ आपल्यावर खूष झाल्याने पदोन्नतीची शक्यता आहे. विवाहोत्सुकासाठी अनुकूल परिस्थिती निर्माण होईल. स्त्री मित्र लाभदायक होतील. निसर्ग सौंदर्य स्थळी पर्यटन होईल. आणखी वाचा
तूळ- आज आपली कामे सहजतेने पूर्ण होतील. मान - सन्मानात वाढ होईल. कार्यालयात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळाल्याने आपला आत्मविश्वास वाढेल. व्यापार्यांच्या व्यापारात तसेच मिळकतीत वाढ होईल. कौटुंबीक जीवन आनंदपूर्ण राहील. स्वास्थ्य चांगले राहील. आणखी वाचा
वृश्चिक- आज आळस, थकवा व चिंता यामुळे कामाचा उत्साह मंद पडल्याचे जाणवेल. विशेषतः संततीची आपणास चिंता वाटेल. कार्यक्षेत्रात सुद्धा अधिकारी वर्गाचे नकारात्मक वागणे आपणास हताश बनवेल. प्रतिस्पर्धी व विरोधक यांची ताकद वाढेल. व्यवसायात संकटे येतील. आणखी वाचा
धनु- आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज आपण नवीन कामाची सुरुवात करू नये. तसेच आपल्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे. कफ किंवा पोटाचे विकार आपल्याला सतावतील. एखादी शस्त्रक्रिया संभवते. आज आपण चिंतीत राहाल. पाण्यापासून दूर राहा. अचानकपणे एखादा आजार सतावेल. खर्चात वाढ होईल. आणखी वाचा
मकर- आजचा दिवस कामाचा व्याप व मानसिक ताण यातून सुटका होऊन मित्र व संबंधितांसह आनंदात व्यतीत कराल. भिन्नलिंगी व्यक्तिंचे आकर्षण वाढेल. उत्तम वैवाहिक सुख प्राप्त होईल. व्यापारी आपल्या व्यापाराचा विस्तार करू शकतील. आर्थिक लाभ व मान - सन्मान ह्यात वृद्धी होईल. स्वास्थ्य उत्तम राहील. आणखी वाचा
कुंभ- आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज आपल्याला कामात यश मिळेल. कुटुंबियांशी अधिक स्नेहाचे व्यवहार होतील. शारीरिक व मानसिक स्वस्थता मिळेल. नोकरी - व्यवसायात सहकारी सहकार्य करतील. आणखी वाचा
मीन- आज आपली कल्पना शक्ती खुलून उठेल. साहित्य निर्मितीसाठी देखील आजचा दिवस अनुकूल आहे. विद्यार्थी अभ्यासात उत्तम प्रगती करू शकतील. आपल्या स्वभावात हळवेवणा राहील. पोटाच्या आजाराची शक्यता आहे. मनात एखादी अनामिक भीती निर्माण होईल. मानसिक संतुलन बिघडू देऊ नका. आणखी वाचा
