आजचे राशीभविष्य - १६ ऑगस्ट २०२२: तूळ राशीतील व्यक्तींना शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल; माता अन् स्त्री वर्गाची चिंता राहील

By ऑनलाइन लोकमत | Published: August 16, 2022 07:21 AM2022-08-16T07:21:49+5:302022-08-16T07:25:20+5:30

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's Horoscope - August 16, 2022: Libra natives will feel physically unwell; Mothers and women will be worried | आजचे राशीभविष्य - १६ ऑगस्ट २०२२: तूळ राशीतील व्यक्तींना शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल; माता अन् स्त्री वर्गाची चिंता राहील

आजचे राशीभविष्य - १६ ऑगस्ट २०२२: तूळ राशीतील व्यक्तींना शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल; माता अन् स्त्री वर्गाची चिंता राहील

Next

मेष- आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. कार्यालयीन किंवा व्यापारी क्षेत्रातील अधिकारी वर्गाशी महत्वाची चर्चा होईल. आणखी वाचा

वृषभ- आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. दूरचे प्रवास संभवतात. आणखी वाचा

मिथुन- आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल. मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल. आणखी वाचा

कर्क- आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज संवेदनशीलता व प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज - मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. दांपत्य जीवन उत्तम राहील. आणखी वाचा

सिंह- आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज उदासीनता व साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. खूप परिश्रम कराल पण त्यामानाने कमी फळ मिळेल. नोकरीत सांभाळून राहा. आणखी वाचा

कन्या- आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. आणखी वाचा

तूळ- आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज सावध राहावे लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आज शक्यतो प्रवास स्थगित ठेवा. वेळेवर भोजन व पुरेशी झोप न मिळाल्याने शारीरिक अस्वास्थ्य जाणवेल. आणखी वाचा

वृश्चिक- आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. भावंडांशी कौटुंबिक चर्चा व नियोजन होईल. तन - मन स्फूर्ती व चैतन्याने भरून जाईल. आणखी वाचा

धनु- आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. मानसिक चंचलता व द्विधा मनःस्थिती ह्यामुळे महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही. आणखी वाचा

मकर- आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरवात प्रसन्न वातावरणाने होईल. घरात मंगलमय वातावरण राहील. मित्र तसेच सगेसोयरे यांच्याकडून भेटवस्तू मिळाल्याने आनंद होईल. कामे सहजपणे पूर्ण होतील. आणखी वाचा

कुंभ- आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज शक्यतो आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. स्वकीयांशी मतभेद होतील. आणखी वाचा

मीन- आज चंद्र मकर राशीस स्थित राहील. आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारी व मित्रांचा सहवास लाभेल. मित्रमंडळीत नव्या मित्रांची भर पडेल. आणखी वाचा

Web Title: Today's Horoscope - August 16, 2022: Libra natives will feel physically unwell; Mothers and women will be worried

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app