Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2022; नवीन कामाला आज सुरूवात करु शकाल, नशिबाची साथ मिळेल

By ऑनलाइन लोकमत | Published: August 13, 2022 07:33 AM2022-08-13T07:33:47+5:302022-08-13T07:41:30+5:30

Today Daily Horoscope Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: Today's Horoscope - 14 August 2022; You can start a new work today, luck will help you | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2022; नवीन कामाला आज सुरूवात करु शकाल, नशिबाची साथ मिळेल

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - 13 ऑगस्ट 2022; नवीन कामाला आज सुरूवात करु शकाल, नशिबाची साथ मिळेल

googlenewsNext

मेष - आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस मिश्र फलदायी आहे. कुटुंबियांसह महत्त्वपूर्ण चर्चा कराल. घराच्या सजावटीत बदल करण्याचा विचार मनात येईल. आणखी वाचा

वृषभ - आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज नवीन काम करण्याची प्रेरणा मिळून त्याची आपण सुरुवात सुद्धा करु शकाल. एखादया रमणीय स्थळाला भेट देऊन आपले मन प्रसन्न होईल. आणखी वाचा

मिथुन - आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज संतापाची भावना आपले नुकसान करेल. आजारी व्यक्तींची तपासणी किंवा शस्त्रक्रिया करावी लागेल. आणखी वाचा

कर्क  - आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज संवेदनशीलता व प्रेमाने व्याप्त होऊन आपले मन भिन्नलिंगी व्यक्तीकडे आकर्षित होईल. मौल्यवान मौज - मजेच्या वस्तू, वस्त्राभूषणे तथा वाहन इत्यादींची खरेदी होईल. आणखी वाचा

सिंह - आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आज उदासीनता व साशंक वृत्ती आपल्या मनाला अस्वस्थ करेल. दैनंदिन कामे पूर्ण व्हायला विलंब लागेल. आणखी वाचा

कन्या - आपल्यासाठी चंद्र पाचवा स्थानी असेल. आजचा दिवस चिंता व उद्वेगाने भरलेला असेल. पोटाच्या त्रासामुळे प्रकृती बिघडेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडचणी येतील. आणखी वाचा

तूळ - आपल्यासाठी चंद्र चवथा स्थानी असेल. आज सावध राहावे लागेल. वैचारिक सुज्ञपणा मानसिक स्वास्थ्य देईल. माता व स्त्री वर्गाची चिंता राहील. आणखी वाचा

वृश्चिक - आपल्यासाठी चंद्र तिसरा स्थानी असेल. आज कामात यश मिळून आर्थिक लाभ होतील. नशिबाची साथ मिळेल. भावंडांशी कौटुंबिक चर्चा व नियोजन होईल. आणखी वाचा

धनु - आपल्यासाठी चंद्र दुसरा स्थानी असेल. आज कुटुंबीयांशी गैरसमज व मतभेद होतील. वायफळ खर्च होईल. मानसिक चंचलता व द्विधा मनःस्थिती ह्यामुळे महत्वाचे निर्णय आज आपण घेऊ शकणार नाही. आणखी वाचा

मकर - आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आजच्या दिवसाची सुरवात प्रसन्न वातावरणाने होईल. घरात मंगलमय वातावरण राहील. आणखी वाचा

कुंभ - आपल्यासाठी चंद्र बारावा स्थानी असेल. आज शक्यतो आर्थिक देवाण - घेवाणीचे व्यवहार करू नका. खर्चाचे प्रमाण वाढेल. शारीरिक व मानसिक स्वास्थ्य मिळणार नाही. आणखी वाचा

मीन - आपल्यासाठी चंद्र लाभात स्थानी असेल. आज समाजात सर्वश्रेष्ठ स्थान प्राप्त कराल. सामाजिक कामात भाग घ्यावा लागेल. वडिलधारी व मित्रांचा सहवास लाभेल. आणखी वाचा  

Web Title: Today Daily Horoscope: Today's Horoscope - 14 August 2022; You can start a new work today, luck will help you

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app