Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०१ ऑगस्ट २०२२: आज चंद्र सिंह राशीत येईल, नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Published: August 1, 2022 07:35 AM2022-08-01T07:35:33+5:302022-08-01T07:40:44+5:30

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today Daily Horoscope: Today's Horoscope - 01 August 2022: Today Moon will come in Leo sign, favorable environment in job and business | Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०१ ऑगस्ट २०२२: आज चंद्र सिंह राशीत येईल, नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण

Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य - ०१ ऑगस्ट २०२२: आज चंद्र सिंह राशीत येईल, नोकरी-व्यवसायात अनुकूल वातावरण

googlenewsNext

मेष:  आज स्वभावातील तापटपणा व हट्टीपणा ह्यावर संयम ठेवावा लागेल. शारीरिक व मानसिक अस्वास्थ्य जाणवेल. खूप परिश्रम करून सुद्धा कमी यश प्राप्त झाल्याने नैराश्य येईल. अधिक वाचा

वृषभ: आज आपण प्रत्येक काम दृढ़ आत्मविश्वास व खंबीर मनोबलासह करून त्यात यश मिळवाल. वडिलांकडून व वडिलार्जित संपत्तीचा लाभ मिळेल. सरकारकडून किंवा सरकारी कामातून आर्थिक लाभ होईल. अधिक वाचा

मिथुन: आजचा दिवस नवीन योजना अंमलात आणण्यासाठी अनुकूल आहे. नोकरीत वरिष्ठ अधिकार्‍याकडून किंवा सरकारकडून परिश्रमाचा यथोचित मोबदला मिळेल. अधिक वाचा

कर्क: आज गैरसमज व नकारात्मक व्यवहार आपल्या मनात ग्लानी निर्माण करतील. प्रकृतीचा विशेषतः डोळ्यांचा त्रास होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. अधिक वाचा

सिंह: आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र प्रथम स्थानी असेल. आज कोणत्याही कामासंबंधी आत्मविश्वासाने त्वरित निर्णय घेऊ शकाल. वडील व वडीलधार्‍यांचा सहवास लाभेल.  अधिक वाचा

कन्या: आपल्या अहंपणामुळे आज भांडण होण्याची शक्यता आहे. शारीरिक व मानसिक चिंतेत दिवस जाईल. स्वभावातील उतावळेपणामुळे काम बिघडण्याची शक्यता आहे. अधिक वाचा

तूळ: आजचा दिवस शुभफलदायी व लाभदायी आहे. मित्रांशी भेट होऊन त्यांच्यासह फिरायला जाल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. पत्नी व संतती यांच्याकडून सुखा - समाधानाचा अनुभव येईल. अधिक वाचा 

वृश्चिक: आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र दशमात स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. नोकरी - व्यवसायातील वातावरण अनुकूल असेल. अधिक वाचा

धनु: आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र भाग्यात स्थानी असेल. आज आपणाला प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. कामात उत्साह व आवेशाचा अभाव राहील. मन चिंतायुक्त राहील. संततीची समस्या हे त्याचे कारण असू शकते. अधिक वाचा

मकर: आज चंद्र रास बदलून सिंह राशीस येईल. आपल्यासाठी चंद्र अष्टमात स्थानी असेल. आज नकारात्मक विचार प्रभावी होऊ देऊ नका. भागीदारांशी संबंध बिघडतील. अचानक प्रवास करावा लागेल. अधिक वाचा

कुंभ:  आपल्यासाठी चंद्र सातवा स्थानी असेल. आज आपणात खंबीर मनोबल व आत्मविश्वास दिसून येईल. प्रणय प्रसंगामुळे दिवस आनंदात जाईल. भिन्नलिंगी व्यक्तींशी परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री वाढेल. अधिक वाचा

मीन: आपल्यासाठी चंद्र सहावा स्थानी असेल. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. मनोबल व आत्मविश्वास वाढेल. आरोग्य खूप चांगले राहील. घरात शांतता व आनंदाचे वातावरण असेल. अधिक वाचा

Web Title: Today Daily Horoscope: Today's Horoscope - 01 August 2022: Today Moon will come in Leo sign, favorable environment in job and business

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app