आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 07:58 IST2025-11-14T07:56:58+5:302025-11-14T07:58:33+5:30
Daily Horoscope: कसा असेल तुमचा आजचा दिवस.. वाचा काय सांगते तुमची रास

आजचे राशीभविष्य, १४ नोव्हेंबर २०२५: सन्मान वाढेल, नोकरीत प्रगती होईल, बोलण्यावर संयम ठेवा!
मेष- शारीरिक व मानसिक शैथिल्य जाणवेल. कष्टाच्या प्रमाणात यश मिळू शकणार नाही. संततीची काळजी सतावेल. कामाच्या धावपळीमुळे कुटुंबियांना योग्य तितका वेळ आपण देऊ शकणार नाही. आणखी वाचा...
वृषभ- आज खंबीर मनोबल व दृढ आत्मविश्वासाने आपली कामे कराल. कामात अपेक्षित यश मिळेल. स्त्रीयांना माहेरहून लाभदायी बातमी मिळेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात गोडी वाटेल. सरकारी कामात यश मिळेल. आणखी वाचा...
मिथुन- आजचा दिवस नवीन योजना सुरु करण्यास उत्तम आहे. व्यावसायिकांना सरकारकडून लाभ मिळेल. तसेच नोकरदारांना वरिष्ठांची मर्जी संपादन करता येईल. भावंडे व शेजारी ह्यांच्याशी मैत्रीपूर्ण संबंध राहतील. आणखी वाचा...
कर्क- आज आपण शारीरिक व मानसिक अस्वस्थता अनुभवाल. परिणामतः मनात नकारात्मक विचार निर्माण होतील. गैरसमजातून काही मतभेद होतील. कौटुंबिक वातावरण गढूळ होईल. आणखी वाचा...
सिंह- आज भरपूर आत्मविश्वास व दृढ निर्णयशक्ती ह्यांच्या जोरावर कोणतेही काम लगेच निर्णय घेऊन पूर्ण कराल. समाजात मान - प्रतिष्ठा वाढेल. वडील तसेच भावना प्रधान लोकांचा सहयोग प्राप्त होईल. आणखी वाचा...
कन्या- आज शारीरिक अस्वस्थते बरोबरच मानसिक चिंता वाढतील. डोळ्यासंबंधी तक्रार निर्माण होईल. कुटुंबियांशी मतभेद होतील. कठोर बोलणे व गर्व ह्यामुळे कोणाशी भांडण होणार नाही ह्याकडे लक्ष द्यावे लागेल. आणखी वाचा...
तूळ- आज विविध क्षेत्रातून फायदा मिळाल्याने शारीरिक व मानसिक दृष्टया आपण आनंदी व स्वस्थ राहाल. मित्रांचा सहवास, एखाद्या रम्य ठिकाणास भेट हे आज नक्की घडेल. आणखी वाचा...
वृश्चिक- आज आपले प्रत्येक काम निर्विघ्नपणे पार पडेल. घरगुती जीवनात आनंद भरून राहील. मान - सन्मान उचांवेल. नोकरी - व्यवसायात प्रगती होईल. वरिष्ठ व वडिलधार्यांकडून फायदा होईल. आणखी वाचा...
धनु- शरीरात थकवा, उबग व बेचैनी राहील. प्रकृती साधारण राहील. मन चिंतित असेल. आज शक्यतो प्रवास टाळावेत. संतती विषयी चिंता निर्माण होईल. नशिबाची साथ मिळणार नाही. आणखी वाचा...
मकर- आजाराच्या तपासण्या, प्रवास किंवा व्यापारातील कामे यासाठी पैसा खर्च होईल. नकारात्मक विचार व राग दूर ठेवल्यास संकटा पासून आपला बचाव करू शकाल. आणखी वाचा...
कुंभ- आजचा दिवस भरपूर आत्मविश्वास व दृढ मनोबल ह्यामुळे प्रणयाराधनेत आपण रंगून जाल. भिन्नलिंगी व्यक्तींचा परिचय होऊन त्यांच्याशी मैत्री निर्माण होईल. आणखी वाचा...
मीन- आज घरातील वातावरण सुख शांतीचे असल्यामुळे दैनंदीन कामे आपण आत्मविश्वास पूर्वक उत्तम प्रकारे करू शकाल. आज आपणास संताप व बोलणे ह्यावर संयम ठेवावा लागेल. आणखी वाचा...
