आजचे राशीभविष्य - १९ जून २०२२: आर्थिक हानीची शक्यता; संबंधीतांशी मतभेद संभवतात, आज नवीन कामे सुरू करू नये!

By ऑनलाइन लोकमत | Published: June 19, 2022 07:23 AM2022-06-19T07:23:15+5:302022-06-19T07:33:55+5:30

Rashi Bhavishya: जाणून घ्या, कसा असेल तुमचा आजचा दिवस..., काय सांगते तुमची राशी...

Today's horoscope - June 19, 2022: Possibility of financial loss; Disagreements with relatives are possible, new work should not be started today horoscope | आजचे राशीभविष्य - १९ जून २०२२: आर्थिक हानीची शक्यता; संबंधीतांशी मतभेद संभवतात, आज नवीन कामे सुरू करू नये!

आजचे राशीभविष्य - १९ जून २०२२: आर्थिक हानीची शक्यता; संबंधीतांशी मतभेद संभवतात, आज नवीन कामे सुरू करू नये!

googlenewsNext

मेष- आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र लाभात स्थानी आहे. आजचा दिवस मित्र व सामाजिक कार्ये ह्यांच्यासाठी धावपळ करण्यात जाईल. पैसा सुद्धा खर्च होईल. नवीन मित्रांच्या ओळखी होतील. भविष्यात त्यांचा उपयोग होईल. सरकारी कामे सफल होतील. आणखी वाचा

वृषभ- आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दशमात स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. विशेषतः व्यापार - व्यवसाय करणार्यांना आजचा दिवस अत्यंत लाभदायक आहे. नोकरीत पदोन्नती संभवते. कार्यालयात वरिष्ठांचे सहकार्य मिळेल. आणखी वाचा

मिथुन- आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र भाग्यात स्थानी आहे. आजचा दिवस प्रतिकूलतेचा आहे. आज आपणास मानसिक व्यग्रता व शारीरिक शिथिलता अनुभवास येईल. काम करायला उत्साह वाटणार नाही. नोकरीत वरिष्ठ व सहकाऱ्यांचे सहकार्य मिळणार नाही. आणखी वाचा

कर्क- आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र अष्टमात स्थानी आहे. आज वैचारिक नकारात्मकता मनात असल्याने दिवसभर आपण अस्वस्थ राहाल. रागावर आज संयम ठेवावा लागेल. खर्च अधिक होईल. कुटुंबियांशी संघर्ष संभवतो. आज नवीन कामे सुरू करू नये. आणखी वाचा

सिंह- आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सातवा स्थानी आहे. आज वैवाहिक जीवनात कटुता निर्माण होण्याची शक्यता आहे. जोडीदाराची प्रकृती बिघडण्याची सुद्धा शक्यता आहे. भागीदार व व्यापारी ह्यांच्याशी शांतपणे व्यवहार करावा. आणखी वाचा

कन्या- आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र सहावा स्थानी आहे. आज उत्साह व स्वास्थ्य उत्तम राहील. घरी व नोकरीच्या ठिकाणी वातावरण आनंदी राहील. सहकार्यांचे अपेक्षित सहकार्य मिळेल. आजारी व्यक्तींच्या प्रकृतीत सुधारणा होईल. आणखी वाचा

तूळ- आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र पाचवा स्थानी आहे. आजचा दिवस मध्यम फलदायी आहे. संततीची काळजी सतावेल. विद्यार्थ्यांना विद्याभ्यासात अडचणी येतील. वाद - विवाद, बौद्धिक चर्चा ह्यापासून शक्यतो दूर राहावे. आणखी वाचा

वृश्चिक- आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र चवथा स्थानी आहे. आजचा दिवस शक्य तितक्या शांतचित्ताने घालवावा. चिंतातुर मन व अस्वस्थ शरीर ह्याचा आपणास त्रास होईल. संबंधीतांशी मतभेद संभवतात. आर्थिक हानीची शक्यता आहे. आणखी वाचा

धनु- आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र तिसरा स्थानी आहे. आज आपण प्रतिस्पर्ध्यांवर मात कराल. आज शारीरिक व मानसिक स्वास्थ्य उत्तम राहील. आजचा दिवस नवीन कामाची सुरूवात करण्यास अनुकूल आहे. आणखी वाचा

मकर- आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र दुसरा स्थानी आहे. आज कुटुंबियांशी वाद होण्याची शक्यता आहे. बोलण्यातील संयमच आपणाला वादातून बाहेर काढेल. सट्टे बाजारात गुंतवणूक करण्याचे नियोजन कराल. आणखी वाचा

कुंभ- आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र प्रथम स्थानी आहे. आजचा दिवस शुभ फलदायी आहे. शारीरिक व मानसिक दृष्टया आनंदी राहाल. व्यावहारिक अनुभव चांगले येतील. कुटुंबीयांसह प्रवासाचा व स्वादिष्ट भोजनाचा आनंद घ्याल. आणखी वाचा

मीन- आज चंद्र कुंभ राशीत आहे. आपल्या राशी पासून चंद्र बारावा स्थानी आहे. आज अतीलोभ व हव्यास ह्यात आपण फसण्याची शक्यता आहे. आर्थिक व्यवहार सावधपणे करावेत. आर्थिक गुंतवणूक करण्यापूर्वी पूर्ण विचार करा. प्रकृती बिघडू शकते. मनाची एकाग्रता होणार नाही. आणखी वाच

Web Title: Today's horoscope - June 19, 2022: Possibility of financial loss; Disagreements with relatives are possible, new work should not be started today horoscope

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

Open in app