कझाकिस्तानमध्ये अडकल्या धामणगावातील तरुणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 2, 2020 05:00 AM2020-06-02T05:00:00+5:302020-06-02T05:00:07+5:30

लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नाही. आता तर जेवणासह इतर गैरसोयींनाही सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय विदेश मंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्र्यांसह नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, ना. आदित्य ठाकरे यांनी दूतावासाकडे प्रयत्न करून सदर विद्यार्थिनींना मायदेशी आणावे, अशी मागणी त्यांच्या पालकांनी केली आहे.

Young woman from Dhamangaon stranded in Kazakhstan | कझाकिस्तानमध्ये अडकल्या धामणगावातील तरुणी

कझाकिस्तानमध्ये अडकल्या धामणगावातील तरुणी

Next
ठळक मुद्देमायदेशी आणा : एमबीबीएस अभ्यासक्रमाच्या विद्यार्थ्यांची आर्त विनवणी

लोकमत न्यूज नेटवर्क
धामणगाव रेल्वे : आम्ही तीन महिन्यांपासून विदेशात अडकलो आहोत. आम्हाला मायदेशी यायचे आहे, अशी विनवणी राज्य शासनाकडे कझाकिस्तान येथे वैद्यकीय शिक्षण घेत असलेल्या धामणगाव, मंगरुळ दस्तगीर, वर्धा व बुलडाणा येथील विद्यार्थिनींनी केली आहे.
लॉकडाऊनमुळे बाहेर पडता येत नाही. आता तर जेवणासह इतर गैरसोयींनाही सामोरे जावे लागत आहे. केंद्रीय विदेश मंत्री, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, केंद्रीय मंत्र्यांसह नितीन गडकरी, खासदार सुप्रिया सुळे, ना. आदित्य ठाकरे यांनी दूतावासाकडे प्रयत्न करून सदर विद्यार्थिनींना मायदेशी आणावे, अशी मागणी त्यांच्या पालकांनी केली आहे.
कझाकिस्तानच्या कारागंदा मेडिकल युनिव्हार्सिटीमध्ये वैद्यकीय शिक्षण घेणारे धामणगाव, मंगरुळ दस्तगीर, वर्धा, बुलढाणा तसेच राज्यभरातील अनेक विद्यार्थी लॉकडाऊनमुळे वसतिगृह, फ्लॅटमध्ये अडकून पडले आहेत. यामध्ये धामणगाव येथील अदिती काळे, मंगरूळ दस्तगीर येथील किरण टेम्पे, बुलडाणा येथील मंजिरी महंत व वर्धा येथील रिया कांबळे, गुंजन बोकडे यांचा समावेश आहे. त्याच ठिकाणी थांबण्याची सूचना करण्यात आली असली तरी या विद्यार्थ्यांना अनेक संकटांना सामोरे जावे लागत आहे. पालकांशी संपर्क होत नसल्याने त्यांच्या चिंतेत भर पडली आहे. या विद्यार्थ्यांच्या सुटकेसाठी लोकप्रतिनिधींसह शासनाने प्रयत्न करावेत, त्यांना एअरलिफ्ट करून परत आणावे, अशी मागणी अदिती काळेचे वडील डॉ. राजेश काळे, सत्यशील टेंम्पे यांनी प्रशासनाकडे केली आहे. दरम्यान विदेशमंत्री व मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून या मुलींना मायदेशी आणण्याचे प्रयत्न करण्याची मागणी केली.

दोन महिन्यांपासून प्रतीक्षा
कझाकिस्तान येथून भारतात परतण्यासाठी अदिती काळे या विद्यार्थिनीचे २३ मार्चचे तिकीट होते. कोरोनाच्या प्रादुभार्वामुळे आंतरराष्ट्रीय विमानसेवा बंद झाल्याने ती अडकली. दोन महिन्यांपासून ती घरी परतण्याच्या आशेवर प्रत्येक दिवस मोजून काढत आहे.

 

Web Title: Young woman from Dhamangaon stranded in Kazakhstan

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.