अंदाजपत्रक तयार निधी का नाही ?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 6, 2019 06:00 AM2019-12-06T06:00:00+5:302019-12-06T06:00:57+5:30

बियाणी ते विद्यापीठ मार्गावर डिव्हायडर बसविले. मात्र, पी ङब्यु ङी ा मनपक प्रशासनाने पथदिवे, रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण केले नाहीत. अशातच आता या मार्गावर पथदिवे व रस्ता रूंदीकरणासाठी बांधकाम विभागाने ३० लाख रुपयांचे अंदाजपत्रक जिल्हा नियोजन विभागाकडे सादर केले आहे. परंतु निधी मंजूर होत नसल्याने ही कामे रखडली आहेत.

Why not have budget ready funds? | अंदाजपत्रक तयार निधी का नाही ?

अंदाजपत्रक तयार निधी का नाही ?

Next
ठळक मुद्देशिवसेना आक्रमक : रस्ता नादुरुस्त

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : जिल्हा नियोजन समिती अंतर्गत बियाणी ते विद्यापीठ मार्गावर पथदिवे व रस्ता दुरूस्तीसाठी सार्वजनिक बांधकाम विभागाने अंदाजपत्रक सादर केले आहे. मात्र, निधी उपलब्ध होत नसल्याने या कामांचा मार्ग रखडला आहे. त्यामुळे जिल्हा प्रशासनाने निधी द्यावा, अन्यथा आंदोलनाचा इशारा गुरूवारी शिवसेनेचे उपशहरप्रमुख अमोल निस्ताने यांनी आरडीसीकडे निवेदनाव्दारे दिला.
बियाणी ते विद्यापीठ मार्गावर डिव्हायडर बसविले. मात्र, पी ङब्यु ङी ा मनपक प्रशासनाने पथदिवे, रस्ता रुंदीकरणाचे काम पूर्ण केले नाहीत. अशातच आता या मार्गावर पथदिवे व रस्ता रूंदीकरणासाठी बांधकाम विभागाने ३० लाख रुपयांचे अंदाजपत्रक जिल्हा नियोजन विभागाकडे सादर केले आहे. परंतु निधी मंजूर होत नसल्याने ही कामे रखडली आहेत. निवेदन देताना अमोल निस्ताने, प्रवीण अळसपुरे, धनजंय बंड, उमेश घुरडे, मोहन क्षीरसागर, संजय देशमुख, जितू मोहोड, छोटू इंगोले, सुनील राऊत, दिनेश ढगे, विजय दुर्गे, अनिल गुंजकर आदी उपस्थित होते.

Web Title: Why not have budget ready funds?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.