अचलपूर-परतवाडा शहराला दिवसातून एकदा पाणीपुरवठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2019 06:00 AM2019-09-20T06:00:00+5:302019-09-20T06:00:48+5:30

चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेंतर्गत अचलपूर-परतवाडा शहराला अचलपूर नगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. जुळ्या शहरात एका व्यक्तीला दिवसाला १३५ लिटर पाणी मिळते. यासाठी अचलपूर नगरपालिका क्षेत्रात एकूण १५ हजार २८ नळ कनेक्शन आहेत. अचलपूर शहरात साडेनऊ हजार, तर परतवाडा शहरात साडेपाच हजार नळ कनेक्शन आहेत.

Water supply once a day to the city of Achalpur -Parwada | अचलपूर-परतवाडा शहराला दिवसातून एकदा पाणीपुरवठा

अचलपूर-परतवाडा शहराला दिवसातून एकदा पाणीपुरवठा

Next
ठळक मुद्देऐन पावसाळ्यात टंचाई : जलशुद्धीकरणाचा वेग मंदावला

लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : चार दिवसांपासून अचलपूर-परतवाडा शहराचा पाणीपुरवठा विस्कळीत झाला आहे. दिवसातून दोन वेळा होणारा पाणीपुरवठा एकदाच केला जात आहे. यात अचलपूर शहराला सकाळी, तर परतवाडा शहराला सायंकाळी होत आहे.
चंद्रभागा पाणीपुरवठा योजनेंतर्गत अचलपूर-परतवाडा शहराला अचलपूर नगरपालिकेकडून पाणीपुरवठा केला जातो. जुळ्या शहरात एका व्यक्तीला दिवसाला १३५ लिटर पाणी मिळते. यासाठी अचलपूर नगरपालिका क्षेत्रात एकूण १५ हजार २८ नळ कनेक्शन आहेत. अचलपूर शहरात साडेनऊ हजार, तर परतवाडा शहरात साडेपाच हजार नळ कनेक्शन आहेत. या व्यतिरिक्त २५५ सार्वजनिक नळ, १४४ हातपंप व २२ ट्यूबवेल आहेत. दरम्यान चार दिवसांपासून दोन्ही शहरांत दिवसातून दोनवेळा चंद्रभागा प्रकल्पातून पाणीपुरवठा योजनेचे पाणी मिळणे बंद झाले आहे. नळातून पाणी उपलब्ध होत नसल्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. चंद्रभागा पाणीपुरवठा योजना चंद्रभागा प्रकल्पावर आहे. या प्रकल्पालगतच पाणीपुरवठा योजनेचे जलशुद्धीकरण केंद्र आहे. धरणातील पाणी या जलशुद्धीकरण केंद्रात शुद्ध होऊन गुरूत्वाकर्षण शक्तीद्वारे नळ योजनेतून नागरिकांना पुरविले जाते.
 

Web Title: Water supply once a day to the city of Achalpur -Parwada

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Waterपाणी