संचारबंदीचे उल्लंघन २९ वाहनचालकांवर गुन्हे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 13, 2020 05:00 AM2020-07-13T05:00:00+5:302020-07-13T05:01:23+5:30

अकारण पायी फिरणे, हॉटेल-प्रतिष्ठान सुरू ठेवणे आदी कारवाईत १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले. जिल्हा प्रशासनाने सोमवारी सकाळी ७ पर्यंत राबविलेल्या संचारबंदीला न जुमानता, काहीही काम नसताना नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलिसांनी ४५ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली.

Violation of curfew on 29 drivers | संचारबंदीचे उल्लंघन २९ वाहनचालकांवर गुन्हे

संचारबंदीचे उल्लंघन २९ वाहनचालकांवर गुन्हे

Next
ठळक मुद्देपोलिसांची माहिती : १० इतर कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : शहरात संचारबंदीचे उल्लघंन करीत विनाकारण फिरणाऱ्या २९ चालकांविरुद्ध पोलिसांनी भादंविचे कलम १८८ व अन्य कलमान्वये गुन्हा नोंदविले आहेत. अकारण पायी फिरणे, हॉटेल-प्रतिष्ठान सुरू ठेवणे आदी कारवाईत १० जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले.
जिल्हा प्रशासनाने सोमवारी सकाळी ७ पर्यंत राबविलेल्या संचारबंदीला न जुमानता, काहीही काम नसताना नागरिक घराबाहेर पडत आहेत. यामुळे पोलिसांनी ४५ ठिकाणी फिक्स पॉर्इंट लावून प्रत्येक वाहनाची कसून चौकशी केली. गाडगेनगर हद्दीत सर्वाधिक १०, फ्रेजरपुरा हद्दीत सात, राजापेठ हद्दीत पाच, शहर कोतवाली हद्दीत पाच, खोलापुरीगेट हद्दीत चार, बडनेरा हद्दीत तीन, वलगाव हद्दीत तीन असे २९ चालक व इतर प्रकरणात १० अशा ३९ जणांविरुद्ध रविवारपर्यंत गुन्हे नोंदविण्यात आले. रविवारीसुद्धा दिवसभर कारवाई सुरू होती. याकरिता मुख्य चौकांमध्ये शहर पोलीस हद्दीत ८०० कर्मचारी तैनात होते.

रविवारी ३००
संचारबंदीचे उल्लंघन करीत फिरणाऱ्या ३०० वाहनचालकांकडून रविवारी ४५ हजारांचा दंड वसूल करण्यात आला. शनिवारी ४१२ वाहनचालकांकडून ६९ हजारांची दंडात्मक रक्कम वसूल करण्यात आली होती. पोलीस निरीक्षक अशोक लांडे, राहुल आठवले यांच्या पथकाने कारवाई केली.

Web Title: Violation of curfew on 29 drivers

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.