फिनलेच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमावलीचा भंग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:01:23+5:30

फिनले मिलच्या मेंटेनन्सची कामे सुरू आहेत. २० ते २५ कर्मचारी याकरिता मिलमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान तीन दिवसांपूर्वी मध्यप्रदेश भोपाळ येथून एक अधिकारी शहरात दाखल झालेत. त्यांचे वास्तव्य देवमाळीत आहे. शहरात दाखल होताच ते फिनले मिलमध्ये पोहचलेत. परिसरात त्यांनी मुक्त सांर केला. प्रवेश गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांसह आत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात ते आलेत.

Violation of Corona regulations by Finlay officials | फिनलेच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमावलीचा भंग

फिनलेच्या अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमावलीचा भंग

Next
ठळक मुद्देअकोला, भोपाळ येथून अधिकारी दाखल : क्वारंटाईनकडे दुर्लक्ष, सुरक्षा धोक्यात

अनिल कडू।
लोकमत न्यूज नेटवर्क
परतवाडा : स्थानिक फिनले मिलमध्ये अकोला, भोपाळहून दाखल झालेल्या अधिकाऱ्यांकडून कोरोना नियमावलीचा भंग केला जात आहे. यात त्यांनी क्वारंटाईनकडे दुर्लक्ष केल्याने तेथी कर्मचाºयांची सुरक्षा धोक्यात आली आहे.
फिनले मिलच्या मेंटेनन्सची कामे सुरू आहेत. २० ते २५ कर्मचारी याकरिता मिलमध्ये कार्यरत आहेत. दरम्यान तीन दिवसांपूर्वी मध्यप्रदेश भोपाळ येथून एक अधिकारी शहरात दाखल झालेत. त्यांचे वास्तव्य देवमाळीत आहे. शहरात दाखल होताच ते फिनले मिलमध्ये पोहचलेत. परिसरात त्यांनी मुक्त सांर केला. प्रवेश गेटवरील सुरक्षा कर्मचाऱ्यांसह आत कार्यरत कर्मचाऱ्यांच्या संपर्कात ते आलेत. याची माहिती देवमाळीच्या कोरोना समितीला मिळाली तेव्हा त्या अधिकाºयाला १४ दिवसांकरिता होमक्वारंटाईन केल्या गेले. यात एक दिवस थांबून संबंधित होमक्वारंटाईन अधिकारी कोरोना समितीला चकमा देऊव भोपाळला निघून गेलेत.
दुसरे अधिकारी अकोल्याहून बुधवारी फिनले मिलमध्ये पोहचलेत. ना आरोग्य तपासणी, ना स्थानिक प्रशासनाला माहिती. यात या अकोला रिटर्न अधिकाऱ्याचाही फिनले मिलमध्ये मुक्त संचार, सुरक्षा रक्षकांसह कर्मचाऱ्यांशी संपर्क आणि संवाद साधत आहेत. अकोला जिल्ह्यातून अमरावती जिल्ह्यातील परतवाडा - अचलपूरमध्ये दाखल होऊन त्या अधिकाऱ्याने क्वारंटाईन होण्यास नकार दिला. या अधिकाºयाचेही वास्तव्य देवमाळीत असल्याने गाव समितीने त्यांना क्वारंटाईचा सल्ला दिला. पण, याकडे दुर्लक्ष करून आम्हाला मिल सुरू करायची आहे. अकोल्याहून मी अपडाऊन करणार असल्याचे त्या अधिकाऱ्याने सांगितले. या दोन अधिकाऱ्यांच्या अशा वागण्याने व स्थानिक प्रशासनाकडून होत असलेल्या दुर्लक्षामुळे शहरवासी भयभीत झाले आहेत. येत्या काही दिवसांत काही अधिकारी मुंबईहून फिनले मिलमध्ये पोहचणार आहेत. बाहेरगावाहून दाखल होणारे व दाखल झालेल्या अधिकाऱ्याच्या मुक्त संचारामुळे सर्व दहशतीखाली आले आहेत.

Web Title: Violation of Corona regulations by Finlay officials

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.