विद्यापीठ कोरोना लॅबने गाठला कर्तव्यपूर्तीचा महिना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 4, 2020 05:00 AM2020-06-04T05:00:00+5:302020-06-04T05:01:20+5:30

संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील लॅब ४ मे रोजी कार्यान्वित झाली. एम्स, नागपूर आणि आयसीएमआर, दिल्ली यांच्या निकषानुसार या लॅबचे कामकाज होत आहे. महिन्याभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्याच त्वरेने विद्यापीठाच्या लॅबमध्ये थ्रोट स्वॅब तपासणीचे काम वेगाने होत आहे. यापूर्वी नमुने नागपूर येथे पाठविले जात होते; तथापि नमुन्यांचे अहवाल येण्यास विलंब होत असल्याने आरोग्य यंत्रणेला उपाययोजना करणे शक्य होत नव्हते.

University Corona Lab reached the month of duty | विद्यापीठ कोरोना लॅबने गाठला कर्तव्यपूर्तीचा महिना

विद्यापीठ कोरोना लॅबने गाठला कर्तव्यपूर्तीचा महिना

Next
ठळक मुद्दे३२८८ नमुन्यांची चाचणी : १८८ पॉझिटिव्ह, २८२८ निगेटिव्ह अहवाल, २३६ सदोष

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या विषाणू परीक्षण प्रयोगशाळेच्या कर्तव्यपूर्तीला गुरुवारी एक महिना पूर्ण होत आहे. आतापर्यंत लॅबमध्ये ३२८८ नमुन्यांची चाचणी करण्यात आली. यात १८८ नमुने पॉझिटिव्ह आले. २८२८ नमुन्यांचा निगेटिव्ह अहवाल देण्यात आले आहे. विद्यापीठाच्या लॅबमुळे जिल्हा आरोग्य प्रशासनाला कोरानाग्रस्तांच्या अहवालांमुळे उपाययोजना करणे शक्य झाले आहे.
संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठातील लॅब ४ मे रोजी कार्यान्वित झाली. एम्स, नागपूर आणि आयसीएमआर, दिल्ली यांच्या निकषानुसार या लॅबचे कामकाज होत आहे. महिन्याभरात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढत आहे. त्याच त्वरेने विद्यापीठाच्या लॅबमध्ये थ्रोट स्वॅब तपासणीचे काम वेगाने होत आहे. यापूर्वी नमुने नागपूर येथे पाठविले जात होते; तथापि नमुन्यांचे अहवाल येण्यास विलंब होत असल्याने आरोग्य यंत्रणेला उपाययोजना करणे शक्य होत नव्हते. मात्र, विद्यापीठात कोरोना लॅब सुरु होेताच दरदिवशी वेगाने नमुने तपासणी होत असून, अहवाल वेळेत मिळत आहे. त्यासाठी लॅबमधील चमू रात्री उशिरापर्यंत कर्तव्य बजावत आहे. येथे दरदिवशी ८० ते १०० नमुने तपासणी करण्यात येत आहे.
गत महिन्याभरापासून लॅबमधील चमू कोरोनायोद्धा ठरली आहे. मध्यंतरी कुलगुरू मुरलीधर चांदेकर यांनी लॅबला भेट देऊन कर्तव्य बजावणाऱ्या चमूचे मनोबल उंचावले होते. लॅबमध्ये निरंतर नमुन्यांची चाचणी होत असल्याने आरोग्य यंत्रणेला कोरोना संसर्ग रोखण्यासाठी उपाययोजना करण्यात मदत होेत आहे. लॅबचे नोडल अधिकारी प्रशांत ठाकरे, नीरज धनवटे, प्रशांत गावंडे, मुकेश बुरंगे, संजयसिंह ठाकूर, उज्ज्वला कवाणे, नीलू सोनी, प्रज्ञा पिंपळकर, पूजा मांडविया, योगेश बेले यांच्यासह एमएस्सीचे विद्यार्थी कोरोनायोद्धा म्हणून सेवा देत आहेत.

विद्यापीठ लॅबमध्ये कोरोना चाचणी सुरू होणे ही मोठी उपलब्धी आहे. आरोग्य यंत्रणेला सहकार्य केले जात आहे. रुग्णसेवा हीच ईश्वरसेवा या गाडगेबाबांच्या दशसूत्रीवर यानिमित्त अंमल होत आहे. लॅबची चमू सामाजिक सेवेच्या भावनेतून कर्तव्य बजावत आहे.
- मुरलीधर चांदेकर, कुलगुरू अमरावती विद्यापीठ.

Web Title: University Corona Lab reached the month of duty

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.