राजस्थानातील ‘त्या’ मजुरांची कंटेनरमधून वाहतूक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 29, 2020 06:00 AM2020-03-29T06:00:00+5:302020-03-29T06:00:56+5:30

या मजुरांची जेवणाची व्यवस्था शुक्रवारी रात्री करण्यात आली. शनिवारी सकाळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सागर ठाकरे यांनी चहाची व्यवस्था करून दिली. रात्री नरेश अंगणांनी यांनी किराणा दिला. परंतु प्रशासन या लोकांची जेवणाची व्यवस्था करू शकत नसल्याने येथील व्यापारी संघटना व नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे यांनी प्रत्येकी चार -चार दिवस आळीपाळीने ८ दिवस सदर कामगारांच्या जेवणाची जबाबदारी स्वीकारली आहे.

Transport of 'those' laborers in Rajasthan through container | राजस्थानातील ‘त्या’ मजुरांची कंटेनरमधून वाहतूक

राजस्थानातील ‘त्या’ मजुरांची कंटेनरमधून वाहतूक

Next
ठळक मुद्देआरोग्य तपासणी : शिरखेड पोलिसांची कारवाई

लोकमत न्यूज नेटवर्क
मोर्शी : राजस्थानातू महाराष्ट्रात लाकडी फर्निचरचे काम करण्याकरिता आलेल्या ८० कारागिरांना राजस्थानला परत घेऊन जाणारा एक मोठा ट्रक मोर्शी तालुक्यातील शिरखेड पोलीस ठाण्याच्या हद्दीत शुक्रवार, २७ मार्चला सायंकाळी पकडण्यात आला. सदर वाहनातील सर्व लोकांना कोरोना तपासणीकरिता येथील उपजिल्हा रुग्णालयात आणण्यात आले. तपासणीअंती पुढील निर्णय घेऊन शिरखेडमधून आणले गेले. या ८० मजुरांमध्ये ५ महिला ४ लहान मुलांचीही तपासणी करून शासकीय वसतिगृहात पाठविले. वसतिगृहात राहण्याची सोय तहसीलदार सिद्धार्थ मोरे यांच्या आदेशानुसार केली आहे.
या मजुरांची जेवणाची व्यवस्था शुक्रवारी रात्री करण्यात आली. शनिवारी सकाळी नगरपालिकेचे आरोग्य सभापती सागर ठाकरे यांनी चहाची व्यवस्था करून दिली. रात्री नरेश अंगणांनी यांनी किराणा दिला. परंतु प्रशासन या लोकांची जेवणाची व्यवस्था करू शकत नसल्याने येथील व्यापारी संघटना व नगरपरिषदेचे माजी उपाध्यक्ष मोहन मडघे यांनी प्रत्येकी चार -चार दिवस आळीपाळीने ८ दिवस सदर कामगारांच्या जेवणाची जबाबदारी स्वीकारली आहे. तरीदेखील सदर मजूर आपल्या गावी जाण्याचा हट्ट सोडत नसल्याचे चित्र आहे. प्राप्त माहितीनुसार राजस्थान वरून मोठ्या प्रमाणात लाकडी कोरीव काम करणारे हे कारागीर महाराष्ट्रात सातत्याने येत असतात. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या दहशतीमुळे सर्वत्र 'लॉकडाऊन' केल्यामुळे सदर कारागीर व त्यांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची वेळ आली आहे. त्यामुळे राजस्थानच्या जोधपूर जिल्ह्यातील ८० कामगार राजस्थानकडे परत जात असताना शिरखेड पोलिसांना आढळून आले. त्यांनी ट्रक क्रमांक आरजे १९ जीएफ ४५०२ हा टाटा कंपनीचा ४०१८ मॉडेलचा ट्रक अडवून त्यांची चौकशी केली असता, ट्रकचा चालक-मालक पताराम केसाराम चौधरी (रा. शेरगड जि. जोधपूर राजस्थान) याने दिलेल्या माहितीवरून, ओरिसा ते महाराष्ट्र दरम्यान विखुरलेल्या समस्त कारागिरांना तो आपल्या गावी राजस्थानात घेऊन जात असल्याचे सांगण्यात आले. सदर वाहन ओडिशावरून राजस्थानातील सर्व मजुरांना घेऊन नागपूर येथे पोहचला. तेथून अमरावती येथील ४० ते ४५ लोकांना घेऊन राजस्थानच्या दिशेने रवाना झाला होता. परंतु शिरखेड पोलिसांनी तो अडवून 'डिटेन' केला. ट्रकचालकाविरुद्ध गुन्हा नोंदविला.

Web Title: Transport of 'those' laborers in Rajasthan through container

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.