जिल्हा अनलॉककडे, पॉझिटिव्हिटी दोन टक्के, मृत्यूचा आलेख घसरला

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2021 05:00 AM2021-06-11T05:00:00+5:302021-06-11T05:00:31+5:30

राज्य शासनाने लॉकडाऊन हटविण्यासंदर्भात पाच स्तर दिले आहेत. त्यात जिल्हा तिसऱ्या स्तरात आहे. मात्र, चार दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत  कमी आलेली आहे. याशिवाय पॉझिटिव्हिटी दोन ते तीन टप्प्याच्या दरम्यान आहे. याशिवाय मृत्यूसंख्येतही कमी आलेली आहे. आता ८० टक्के ऑक्सिजन बेड रिक्त आहेत. जिल्ह्याची अशीच वाटचाल राहिल्यास पुढील आठवड्यात जिल्हा अनलॉक होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे.

Towards District Unlock, the positivity dropped two percent, the death graph | जिल्हा अनलॉककडे, पॉझिटिव्हिटी दोन टक्के, मृत्यूचा आलेख घसरला

जिल्हा अनलॉककडे, पॉझिटिव्हिटी दोन टक्के, मृत्यूचा आलेख घसरला

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
अमरावती : चार महिन्यांपासून वाढलेले कोरोनाचे संक्रमण आता कमी झालेले आहे. बुधवारी जिल्ह्याची पॉझिटिव्हिटी २.१३ टक्केच नोंद झाल्याने जिल्ह्याला दिलासा मिळाला आहे. त्यामुळे जिल्ह्याची आता अनलॉककडे वाटचाल सुरू झालेली आहे. येत्या आठवड्यात जिल्हा अनलॉक होण्याची शक्यता आहे.
राज्य शासनाने लॉकडाऊन हटविण्यासंदर्भात पाच स्तर दिले आहेत. त्यात जिल्हा तिसऱ्या स्तरात आहे. मात्र, चार दिवसांपासून सातत्याने रुग्णसंख्येत  कमी आलेली आहे. याशिवाय पॉझिटिव्हिटी दोन ते तीन टप्प्याच्या दरम्यान आहे. याशिवाय मृत्यूसंख्येतही कमी आलेली आहे. आता ८० टक्के ऑक्सिजन बेड रिक्त आहेत. जिल्ह्याची अशीच वाटचाल राहिल्यास पुढील आठवड्यात जिल्हा अनलॉक होण्याची शक्यता जिल्हा प्रशासनाने वर्तविली आहे.
जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्यांपासून कोरोनाची दुसरी लाट सुरू झाली व साधारणपणे चार महिन्यात या लाटेने अवघा जिल्हाच व्यापला. या कालावधीत ७०,४६९ पॉझिटिव्ह व १,०४३ रुग्णांचे मृत्यू झालेले आहेत. वाढत्या रुग्णसंख्येवर नियंत्रण मिळविण्यासाठी २० फेब्रुवारीपासून वीकएंड कर्फ्यू लावला होता. तेव्हापासून आतापर्यंत कमी-अधिक प्रमाणात संचारबंदी सुरूच आहे. मात्र, संसर्गात कमी आल्याने जिल्ह्याच्या आशा पल्लवित झाल्या. नागरिकांनी त्रिसूत्रीसह कोरोना प्रतिबंधक उपाययोजनांचे पालन गरजेचे आहे.

- तर मिळणार अर्थचक्राला गती
जिल्ह्यात ७ जूनपासून लॉकडाऊनच्या निकषात काहीअंशी बदल केले आहेत. अन्य दुकानांसाठी विकएंड कर्फ्यू सुरूच आहे. त्यामुळे खऱ्या अर्थाने जिल्ह्याच्या अर्थचक्राला गती द्यायची असेल तर लॉकडाऊन हटविणे आवश्यक आहे. तसे पाहता जिल्ह्यात २० फेब्रुवारीपासून मिनी लॉकडाऊन सुरूच असल्याने नागरिकांच्या संतप्त भावना आहेत.

अनलॉकचे अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना
जिल्ह्यात संचारबंदी हटविण्या संदर्भातील अधिकार जिल्हाधिकाऱ्यांना दिलेले आहे. पाच लेव्हल तयार केलेल्या आहेत. यात जिल्हा तिसऱ्या स्थानी होता. याबाबत पॉझिटिव्हिटी पाच ते दहा टक्क्यांदरम्यान व ऑक्सिजन बेड ४० टक्क्यांवर व्यापले असेल.

किमान एक आठवडा पॉझिटिव्हिटी कमी यायला पाहिजे, असे झाल्यास पुढच्या आठवड्यात जिल्हा अनलॉक होऊ शकतो. याकरिता नागरिकांनी त्रिसूत्रीचे पालन करणे गरजेचे आहे. 
- शैलेश नवाल, जिल्हाधिकारी

Web Title: Towards District Unlock, the positivity dropped two percent, the death graph

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.