पथ्रोटमध्ये मुसळधार; ट्रॅक्टर अर्धे बुडाले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 25, 2020 05:00 AM2020-07-25T05:00:00+5:302020-07-25T05:00:12+5:30

नाल्याच्या उगमावर व पथ्रोट परिसरातील शेतात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाच वर्षांनंतर ग्रामस्थांना मोठा पूर अनुभवायला मिळाला. शहानूर धरण होण्यापूर्वी या नाल्याला मोठे पूर जात होते. मात्र, सन १९८२ मध्ये शहापूर धरणाची निर्मिती झाल्यामुळे शहानूर धरणाच्या उगमावर पाण्यात तर काही शहानूर कालव्यामध्ये जात असल्याकारणाने नाल्याला कमरेइतकेच पुराचे पाणी येत होते.

Torrent in Pathrot; The tractor sank halfway | पथ्रोटमध्ये मुसळधार; ट्रॅक्टर अर्धे बुडाले

पथ्रोटमध्ये मुसळधार; ट्रॅक्टर अर्धे बुडाले

googlenewsNext
ठळक मुद्देथापेरा नाल्याला पूर : बैलजोडी वाहिली, वस्तीत शिरले पावसाचे पाणी, जनजीवन विस्कळीत, प्रशासनातर्फे नुकसानाचे सर्वेक्षण सुरू

अरूण पटोकार।
लोकमत न्यूज नेटवर्क
पथ्रोट : गुरुवारी दुपारी दोन तास कोसळलेल्या मुसळधार पावसाने पथ्रोट गावात हाहाकार उडाला. अलीकडच्या १५ ते २० वर्षांत असा पाऊस अनुभवला नसल्याची प्रतिक्रिया जुण्याजाणत्यांनी दिली. सखल भागात ५ ते ७ फूट पाणी होते. गावातील थापेरा नाल्याच्या पुराचे पाणी गावात शिरल्याने मोठे नुकसान झाले. या पाण्यात एक बैलजोडी वाहून गेली. ती शुक्रवारी गावालगत मृतावस्थेत आढळली. गावातील एका चौकात दोन ट्रॅक्टर अर्धे बुडाले होते.
गुरूवारी दुपारी ४ च्या सुमारास पावसाला सुरूवात झाली. सलग दोन तास मुसळधार पाऊस कोसळल्याने नदी नाले एकत्र झाले. त्यातच थापेरा नाल्याच्या उगमावर मुसळधार पाऊस झाल्यामुळे अचानक आलेल्या नाल्याच्या पुरामध्ये येथील शेतकरी रामदास उपरीकर यांची गोठ्यात बांधलेली बैलजोडी खोडासहित वाहून गेल्यामुळे दोन्ही बैल मरण पावले. खरिपाच्या पावसाळ्यातील भर हंगामात त्यांचे ८० हजार रुपयांचे नुकसान झाले.
नाल्याच्या उगमावर व पथ्रोट परिसरातील शेतात मुसळधार पाऊस झाल्यामुळे पाच वर्षांनंतर ग्रामस्थांना मोठा पूर अनुभवायला मिळाला. शहानूर धरण होण्यापूर्वी या नाल्याला मोठे पूर जात होते. मात्र, सन १९८२ मध्ये शहापूर धरणाची निर्मिती झाल्यामुळे शहानूर धरणाच्या उगमावर पाण्यात तर काही शहानूर कालव्यामध्ये जात असल्याकारणाने नाल्याला कमरेइतकेच पुराचे पाणी येत होते. मात्र, गुरुवारी झालेल्या पावसामुळे पथ्रोट नाला तुडूंब भरून वाहिल्याने पथ्रोट येथील काही वस्तीत पाणी शिरले. त्यामुळे जनजीवन विस्कळीत झाले. पथ्रोटमधील माळीपुरा, जयसिंगपुरा, आंबेडकर चौक, गुजरी लाईन, आर्य समाज चौक, ग्रामसचिवालय व सोसायटीच्या आवारात नाल्याच्या पुराचे पाणी शिरले आहे.

दुकाने पाण्यात
ग्रामपंचायत प्रशासनाच्या वतीने काहींना गावातील मुख्य चौकात हलविता येणारी टिनाची दुकाने देण्यात आली. त्या टपऱ्या अर्ध्यापर्यंत पाण्यात बुडाल्या. गावाच्या अनेक भागात ५ ते सहा फूट पाणी होते. गावातील झोपडपट्टी परिसराला या पावसाचा मोठा फटका बसला आहे. शुक्रवारी स्थानिक प्रशासनाच्यावतीने पंचनाम्यास सुरूवात करण्यात आली.

शहानूर धरणाचा जलसाठा ५१ टक्क्यांवर
आठ दिवसांपूर्वी शहानूर नदीच्या उगमावर दमदार पाऊस झाल्याने ४७ टक्के जलसाठा होता. गुरूवारअखेर या धरणातील जलसाठा ५१ टक्क्यांपर्यंत पोहोचल्याची माहिती शाखा अभियंता योगेश मोरे यांनी दिली.

जवळापुरातही पाऊस
अचलपूर तालुक्यातील जवळापूर गावातील आठ ते दहा घरांमध्ये पावसाचे पाणी शिरले. गावातील शाळेपर्यंत पावसाचे पाणी साचले होते. शेतशिवारातील नाला फुटल्यामुळे पुराच्या पाण्याने सुनील कडू व त्यांच्या लगतच्या शेतातील पिके खरडून गेली.

Web Title: Torrent in Pathrot; The tractor sank halfway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.

टॅग्स :Rainपाऊस