हजारो हेक्टर पीक पाण्याखाली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 11, 2020 05:00 AM2020-07-11T05:00:00+5:302020-07-11T05:00:07+5:30

चांदूर बाजार तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी जवळपास आटोपल्या आहेत. काही ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निघाले नाही, तेथे दुबार पेरणी करण्यात आली. मात्र, दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने ती दडपण्याची भीती व्यक्त होत आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने पेरणी लवकरच आटोपली. तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र ६८ हजार ५०८ हेक्टर असून, त्यामधील पेरणी योग्य क्षेत्रफळ ५९ हजार २ हेक्टर आहे.

Thousands of hectares of crops under water | हजारो हेक्टर पीक पाण्याखाली

हजारो हेक्टर पीक पाण्याखाली

Next
ठळक मुद्देतूर, सोयाबीनचे नुकसान : चांदूर बाजार तालुक्यात दमदार पाऊस

लोकमत न्यूज नेटवर्क
तळवेल : तालुक्यात बुधवारी कोसळलेल्या दमदार पावसाने हजारो हेक्टरमधील पिके पाण्याखाली आले आहेत. शेतीला तलावाचे स्वरूप प्राप्त झाले. शेतकऱ्यांकडून सर्वेक्षणाची मागणी होत आहे.
तळवेल, खराळा, खरवाडी, जवळा शहापूर, घाटलाडकी, ब्राम्हणवाडा, नानोरी, करजगाव, दिलालपूर या भागात मुसळधार पाऊस झाल्याने तीन दिवसानंतरही शेतातील पाणी निघालेले नाही. तूर, कपाशी व सोयाबीनचे मोठे नुकसान झाले आहे.
चांदूर बाजार तालुक्यात खरीप हंगामातील पेरणी जवळपास आटोपल्या आहेत. काही ठिकाणी सोयाबीनचे बियाणे निघाले नाही, तेथे दुबार पेरणी करण्यात आली. मात्र, दोन दिवसांच्या मुसळधार पावसाने ती दडपण्याची भीती व्यक्त होत आहे. खरीप हंगामाच्या सुरवातीपासूनच पावसाने हजेरी लावल्याने पेरणी लवकरच आटोपली. तालुक्यातील एकूण भौगोलिक क्षेत्र ६८ हजार ५०८ हेक्टर असून, त्यामधील पेरणी योग्य क्षेत्रफळ ५९ हजार २ हेक्टर आहे. बुधवारी मध्यरात्री अचानक मुसळधार पाऊस आल्याने अनेक शेतांमध्ये पावसाचे पाणी साचले आहे. या साचलेल्या पाण्याने तूर पीक जळल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
नाफेड कापूस खरेदीत नोंदणीपासूनच शेतकºयांना असह्य त्रास झाल्याने अनेकांनी कपाशीऐवजी तूर व सोयाबीनला पसंती दिली. परंतु, सोयाबीनच्या न उगवलेल्या बियाण्यांमुळे आणखी एका संकटाची भर पडली आहे.

Web Title: Thousands of hectares of crops under water

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.