‘त्या’ मृत कोंबड्या जमिनीत पुरल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 23, 2021 04:20 AM2021-02-23T04:20:44+5:302021-02-23T04:20:44+5:30

प्रशासनाकडून दखल : अंजनगाव बारी : लगतच्या पार्डी-मालखेड (रेल्वे) परिसरात मृत कोंबड्या आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ...

‘Those’ dead hens were buried in the ground | ‘त्या’ मृत कोंबड्या जमिनीत पुरल्या

‘त्या’ मृत कोंबड्या जमिनीत पुरल्या

Next

प्रशासनाकडून दखल :

अंजनगाव बारी : लगतच्या पार्डी-मालखेड (रेल्वे) परिसरात मृत कोंबड्या आढळल्यामुळे नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. अनेक कोंबड्या रस्त्यालगत मृतावस्थेत पडल्या होत्या. परिणामी, सोमवारी दुपारी पशुसंवर्धन विभागाच्या चमूने विविध गावांनजीक घटनास्थळ गाठत त्या कोंबड्या एकत्र केल्या. जेसीबीच्या साहाय्याने खड्डे करून त्यामध्ये त्या मृत कोंबड्या पुरल्या.

अमरावतीचे नायब तहसीलदार, ग्रामसेवक व तलाठी यांनी अंजनगाव बारीलगतच्या पार्डी, भानखेड, मालखेड (चांदूर बाजार), लालखेड, पळसखेड, मांजरी म्हसला, येरणगाव, पोहरा येथे पोहोचून जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या कर्मचाऱ्यांना मृत कोंबड्यांचे घटनास्थळ दाखविले. मृत कोंबड्यांची योग्य विल्हेवाट लावण्यात आल्याचे अंजनगाव बारीचे तलाठी संजय पत्रे यांनी ‘लोकमत’ला सांगितले. प्रशासनाकडून मृत कोंबड्यांची विल्हेवाट लावण्यात आल्याने ग्रामस्थांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे.

Web Title: ‘Those’ dead hens were buried in the ground

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.